शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST

गोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पाठपुरावा करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी ...

गोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पाठपुरावा करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे व उपशिक्षणाधिकारी पारधी यांना भेटून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच उपशिक्षणाधिकारी पारधी यांच्यासोबत मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

चर्चेत, जीपीएफच्या पावत्या काही तालुक्यात मिळाल्या परंतु त्यात तफावत आहे. ६ व्या वेतन आयोगाच्या ५ हप्त्यांची नोंद नाही. त्यामुळे या हप्त्यांची राशी जमा झाली की नाही याची माहिती नाही. या बाबतीत पाठपुरावा शिक्षण विभागातून करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावर जीपीएफचा हिशोब संगणकीकृत होत असल्याचे सांगत सर्व अडचणी दूर होतील असे पारधी यांनी सांगितले. डीसीपीएस धारक शिक्षकांच्या सीपीएफ कपातीची हिशोब पावती देण्यात यावी, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचे रिक्त पद भरण्यात यावे, विज्ञान विषय शिक्षकांचे रिक्त पद भरण्यात यावे, चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी मूल्यमापन समितीच्या मंजुरीसाठी सेवापुस्तिका शिक्षण विभागामध्ये आहे. अनेक शिक्षक या वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित असून ४ टक्के सादिलवार राशी शाळांना देण्यात यावी, २००९ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना कायम आदेश देण्यात यावे, विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, वेतन देण्याची सध्याची प्रणाली असली तरी चालेल परंतु वेतन १ तारखेला देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. वेतन उशिरा मिळत असल्याने सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जावर व्याजाचा भुर्दंड शिक्षकांवर बसतो म्हणून हा प्रश्न गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

तसेच कोविड-१९ चे काम करताना मरण पावलेल्या शिक्षकांना विमा संरक्षण लाभ देण्यात यावे, मराठी माध्यमातील शिक्षकांना हिंदी माध्यमाच्या शाळा देण्यात आल्या त्यांना मराठी माध्यमाच्या शाळा देण्यात याव्या आदी विषय मांडण्यात आले. यावर उपशिक्षणाधिकाऱ्यांनी समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. चर्चेला जिल्हाध्यक्ष डी.टी.कावळे, सरचिटणीस एस.यू.वंजारी, संपर्क प्रमुख अजय चौरे, प्रसिद्धी प्रमुख कृष्णा कापसे, तालुका नेते राजू रहांगडाले, सरचिटणीस अशोक तावाडे, राजेश भरडे, जे.पी.कांरजेकर, ए.बी.मेश्राम, बिसेन उपस्थित होते.