शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचे ‘नो मास्क, नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:25 IST

गोंदिया : काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे दक्षता बाळगे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंग ...

गोंदिया : काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे दक्षता बाळगे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंग याच गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे यांनी कोरोनाविषयक जनजागृती आणि नियमांचे पालन करण्यासाठी स्वत:पासून शिस्त लावली आहे, तसेच शासकीय महाविद्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुरुवारपासून ‘नो मास्क, नो एन्ट्री’चा नियम लागू केला आहे. यासाठी त्यांनी गुरुवारी विनामास्क मेडिकलमध्ये येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावरूनच परत पाठविले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला, तरी काही जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशात याकडे थोडेही दुर्लक्ष करणे भोवू शकते. त्यामुळेच दक्षता आणि काळजी घेणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. त्यामुळेच मेडिकलचे अधिष्ठाता यांनी काळजी घेत मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आदींचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात केली आहे, तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्कचा नियमित वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हावासीयांनीही काेरोनाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष न करता, आवश्यक ती काळजी घेतल्यास जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यास मदत होऊ शकते.

.......

कोरोना टेस्टची संख्या वाढविणार

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, तसेच पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात कोरोना टेस्ट वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत. त्यामुळेच आता मेडिकलमध्ये दररोज ७०० कोरोना टेस्ट केल्या जाणाऱ्या आहेत, तर ग्रामीण भागातही टेस्टची संख्या वाढविण्याच्या सूचना केल्या आहे.