लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील एक ते दीड वर्षापासून या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले. परंतु त्यांना काहीच काम नसल्याने खुर्च्या मोडून मागील वर्षभरापासून वेतनाची उचल करीत आहे. तर त्यांची विदर्भ एक्सप्रेसने अपडाऊन करण्याची पंरपरा कायम असून अद्यापही याला लगाम लागलेला नाही.केटीएस किंवा बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात डॉक्टरांची कमतरता असताना या वैद्यकीय महाविद्यालयातील काही कर्मचारी, अधिकारी विदर्भ एक्सप्रेसने दुपारी १२ वाजता येणे व तीन तास खुर्च्या मोडून २.५५ च्या विदर्भ एक्सप्रेने परत जातात. गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय रूग्णांच्या सेवेसाठी तयार होत आहे.यासाठी लोकप्रतिनिधींनी मेहनत घेऊन जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय शासनाकडून मंजूर करवून घेतले. या ठिकाणी काम करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग एकचे अधिष्ठाता एक, प्राध्यापक ४, सहयोगी प्राध्यापक १०, वर्ग २ चे सहायक प्राध्यापक ९, वर्ग ३ चे वरिष्ट सहाय्यक २, वरिष्ट लिपीक ८, कनिष्ठ लीपीक ११, लघुलेखक ५, तंत्रज्ञ १, प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ ५, कलाकार १,ट्यूटर १, वरिष्ठ निवासी ४ व शिपायांची ६२ पदे असे एकूण १२४ कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत. या पैकी जवळ-जवळ सर्वच अधिकारी कर्मचारी बाहेर गावावरून अपडाऊन ये-जा करतात. मात्र गोंदियात मुख्यालयी राहात असल्याची खोटी माहिती शासनाला पुरवून येथील अधिकारी कर्मचारी घरभाडे भत्ता घेत असल्याची माहिती आहे. त्या कर्मचारी अधिकारी यांनी यांनी घेतलेला घरभाडे भत्ता त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा असा सूर उमटत आहे.वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरीसाठी वेळ आहे.त्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेडीकल कॉलेजला मंजुरी मिळेपर्यंत केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सेवा देणे रूग्णांना अपेक्षित आहे. परंतु येथे आलेले काही अधिकारी कर्मचारी वर्षभरापासून खुर्च्या मोडत आहेत.लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?शासकीय महाविद्यालयात १२४ कर्मचारी अधिकारी कार्यरत असून आतापर्यंत या वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांनी एकाही रूग्णाची तपासणी केली नाही. किती रूग्णाची तपासणी केली याचा आकडा मिळेल का असे येथील अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया यांना विचारणा केल्यावर त्यांनी एकाही रूग्णाची माहिती देऊ शकत नाहीत. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या अधिकारी कर्मचाºयांना केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सेवा देण्यास बाध्य करण्याची मागणी होत आहे.
मेडीकलच्या विदर्भवीरांची अपडाऊनची पंरपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST
केटीएस किंवा बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात डॉक्टरांची कमतरता असताना या वैद्यकीय महाविद्यालयातील काही कर्मचारी, अधिकारी विदर्भ एक्सप्रेसने दुपारी १२ वाजता येणे व तीन तास खुर्च्या मोडून २.५५ च्या विदर्भ एक्सप्रेने परत जातात. गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय रूग्णांच्या सेवेसाठी तयार होत आहे.
मेडीकलच्या विदर्भवीरांची अपडाऊनची पंरपरा कायम
ठळक मुद्देघरभाडे भत्ता घेणार का? : मुख्यालयी न राहणाऱ्यांची चौकशी करा