शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचालकाची कंपाउंडरला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:33 IST

........... पत्नीला पतीने दिली ठार करण्याची धमकी गोंदिया : शहराच्या कुंभारे नगरातील अशोक सम्राट चौकातील सुनीता संजय गणवीर (३५) ...

...........

पत्नीला पतीने दिली ठार करण्याची धमकी

गोंदिया : शहराच्या कुंभारे नगरातील अशोक सम्राट चौकातील सुनीता संजय गणवीर (३५) यांनी १८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आपल्या पतीला मुलाला दवाखान्यात घेऊन जा, असे म्हटले असता आरोपी संजय शालिकराम गणवीर (३९, रा. अशोक सम्राट चौक, कुंभारेनगर, गोंदिया) यांनी तिला शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. या घटनेसंदर्भात संजय विरुद्ध गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

....

कलारीटोला येथील महिलेचा मृत्यू

गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या येथील शारदा चैतराम खांडवाये (२८) या महिलेचा २० ऑगस्ट रोजी सकाळी १०.४० वाजता गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तिला नातेवाइकांनी उपचारासाठी दाखल केले होते. डॉ. मोनल अग्रवाल यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

......

महिलेकडून दहा लिटर मोहफुलाची दारू जप्त

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुंभारेनगरच्या रेल्वे चौकीजवळील प्रभा उत्तम मेश्राम (५०) या महिलेकडून १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास पोलीस शिपाई महेंद्र ताजणे यांनी १० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत एक हजार रुपये सांगितली जाते. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

......

ठार करण्याची धमकी

गोंदिया : शहराच्या पैकनटोली बजाजवॉर्ड गोंदिया येथील एका २२ वर्षांच्या वर्ग मैत्रिणीला आमगाव येथील आरोपी पंकज मोहबिया (२२) याने १८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता मोबाइलवर मेसेज करून लग्नासाठी प्रपोज केला. ते दोघेही एकाच वर्गात शिकत असताना त्या दोघांची ओळख होती. ते दोघेही मित्र असल्याचे त्या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. परंतु त्या तरुणीने लग्नाला नकार दिल्याने आरोपी पंकज मोहबीया याने तिला शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. या घटनेसंदर्भात १९ ऑगस्ट रोजी गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

...................

तक्रार केली म्हणून ठार करण्याची धमकी

गोंदिया : येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या परिसरात १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता संध्या जितेंद्र गजभिये (५०, रा. डब्लिंग कॉलनी, गोंदिया) ह्या चहा दुकानात असताना आरोपी राहुल चिचखेडे (२५, रा. चिचटोली, छोटा गोंदिया) याने गंगाबाईसमोरील चहाच्या टपरीवर जाऊन तू माझ्या विरोधात तक्रार का दिली, असे बोलून तिला शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

.......................

महिलेकडून सात लिटर दारू जप्त

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गौतमनगर रेल्वे लाइनजवळील प्रभा संजय प्रेम (५०) या महिलेकडून १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता सात लिटर मोहफुलाची दारू पोलीस शिपाई सुमित गावंडे यांनी जप्त केली आहे. त्या महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल केला आहे.