शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कॉलेज पुढच्या वर्षीच

By admin | Updated: June 19, 2015 01:26 IST

गोंदियातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी सुरू होणार नसले तरी पुढील वर्षी ते सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करू, ...

गोंदिया : गोंदियातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी सुरू होणार नसले तरी पुढील वर्षी ते सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार नाना पटोले यांनी येथे पत्रकारांना दिली. याचवेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी ४५० रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचा दावाही त्यांनी केला.गेल्या दोन-तीन दिवसांपासून गोंदियाच्या प्रस्तावित मेडिकल कॉलेजसंदर्भात उठत असलेल्या वावड्यांवर पडदा टाकताना खा.पटोले यांनी ही माहिती दिली. यावर्षी मेडिकल कॉलेज सुरू न होणे हे सरकारचे अपयश आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, हे या सरकारचे नाही तर आधीच्या सरकारच्या काळातील व्यवस्थेचा दोष आहे. त्यांनी अनेक कामे प्रत्यक्षात न करता त्याचा गवगवाच जास्त केला. त्यामुळे मेडिकल कौन्सिलने अनेक त्रुटी काढल्या. अजूनही काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. आपण खासदार होईपर्यंत जागेचाही प्रश्न मिटलेला नव्हता. मात्र आता बरीच कामे आटोक्यात आली असून पुढील वर्षीपर्यंत मान्यता मिळून मेडिकलसाठी प्रवेश सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. गोंदियातील गँगवारच्या घटनेसंदर्भात बोलताना जे कोणी या प्रकरणात गुन्हेगार असतील त्यांना सोडले जाणार नाही, असे सांगून नागरिकांनी अशा व्यवस्थेचा सामूहिकपणे विरोध करून दहशत निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे हाणून पाडावे असे आवाहन त्यांनी केले.प्रदेश उपाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपच्या जिल्हा कार्यालयात आलेल्या खा.पटोले यांचे सुरूवातीला महामंत्री संतोष चव्हाण, शहर अध्यक्ष भरत क्षत्रिय, जिल्हा महामंत्री दीपक कदम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष संजय कुळकर्णी, जि.प.चे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, विरेंद्र जयस्वाल आदींनी स्वागत केले. (जिल्हा प्रतिनिधी)