शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

मेडिकल कॉलेजचे बजेट ४०० कोटींपेक्षा जास्त

By admin | Updated: January 4, 2015 23:14 IST

गोंदियातील बहुप्रतीक्षित मेडिकल कॉलेजसाठी ४०० कोटी रुपयांचे बजेट बनविण्यात आले आहे. मात्र हे कॉलेज सुरू करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे आता त्या बजेटमध्ये आणखी

गोंदिया : गोंदियातील बहुप्रतीक्षित मेडिकल कॉलेजसाठी ४०० कोटी रुपयांचे बजेट बनविण्यात आले आहे. मात्र हे कॉलेज सुरू करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे आता त्या बजेटमध्ये आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील सत्रापासून गोंदियात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी यासाठी जोर लावून हे महाविद्यालय गोंदियात मंजूर करून आणले होते. मात्र निकषांची पूर्तता करू न शकल्यामुळे मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने तो प्रस्ताव मान्य केला नव्हता. मात्र नंतर सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. आता भाजप सरकारनेही या मेडिकल कॉलेजसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. गोंदियातील कुडवा भागात दूध डेअरीच्या समोरील भागातील जागा मेडिकल कॉलेजसाठी मिळाली आहे. त्या ठिकाणी प्रशासकीय इमारतीसह डॉक्टरांचे क्वॉर्टरही राहणार आहेत. याशिवाय गं्रथालय, ६ प्रयोगशाळा राहणार आहेत. याशिवाय याच ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचीही व्यवस्था केली जाणार आहे.मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची चमू नुकतीच गोंदियात आली होती. त्यांनी ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात सुरू केले जाणार आहेत त्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात, बाई गंगाबाई रुग्णालयात आणि कुडवा येथील शासकीय दूध डेअरीसमोरील जागेचे निरीक्षण केले. महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली २५ एकराची जागा कुडवा येथे उपलब्ध झाली असल्याचे सांगितले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)