शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेडीकल कॉलेज पडले आजारी

By admin | Updated: March 5, 2017 00:13 IST

गोंदियातील रूग्णांची सोय व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींच्या मेहनतीमुळे वैद्यकीय महाविद्यालय आले.

ना सलाईन, ना इंजेक्शन : अपघातातील रूग्णांना मरणयातना गोंदिया : गोंदियातील रूग्णांची सोय व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींच्या मेहनतीमुळे वैद्यकीय महाविद्यालय आले. रूग्णांना उत्तम सेवा मिळेल हा त्या मागचा हेतू होता. परंतु केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात मिळणाऱ्या सेवा पेक्षाही कितीतरी कमी प्रमाणात या मेडीकल कॉलेजमध्ये सेवा मिळत असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील १३ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची काळजी घेण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून मेडीकल कॉलेज आणले. या मेडीकल कॉलेजमुळे रूग्णांचा त्रास कमी होणे अपेक्षीत होते. परंतु येथे उलटी गंगा वाहात आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे सर्व अधिकार असताना येथे रूग्णांचा संथ गतीने का असेना उपचार होत होता. मात्र मेडीकल कॉलेज सुरू झाले तेव्हापासून रूग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या मेडीकल कॉलेज मध्ये सद्यस्थितीत ना सलाईन, ना इंजेक्शन अशी अवस्था येथे आहे. अपघातातील जखमींची शस्त्रक्रिया पंधरा-पंधरा दिवस होत नाही. साहित्य उपलब्ध नसल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. येथील रूग्णांची सोनोग्राफी वेळेवर होत नाही. बाहेरून सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. सिटीस्कॅन मशीन वर्षभरापासून बंद पडून आहे. डॉक्टर नसल्याने रूग्णांचा उपचार वेळेवर होत नाही.(तालुका प्रतिनिधी) प्रत्येक रात्र ठरते काळ रात्र गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात रात्रीच्यावेळी डॉक्टर नसतात. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रूग्णांचा उपचार होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांचा मृत्यू होण्याची मालिकाच सुरू आहे. रात्रीच्यावेळी डॉक्टर नाही अशातच रूग्णांच्या नातेवाईकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी संबंधित डॉक्टरांना फोन करून उपचार करण्याची विनंती केल्यास त्या डॉक्टरांना वैद्यकीय अधिष्ठाता तुम्ही दुसऱ्यांच्या कामात ढवळा-ढवळ केलात असा ठपका ठेवतात. यामुळे इतरही डॉक्टर उपचार करण्यास मागे पुढे पाहत आहेत. एकीकडे उपचारासाठी डॉक्टर ठेवायचे नाही आणि एखाद्या डॉक्टरने मदत केल्यास त्यांच्यावर ठपका ठेवणे हे कितपत योग्य आहे. काम न करताच उचलतात पगार गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात अनेक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु येथे फक्त सहाच डॉक्टर कार्यरत आहेत. जे काम करतात त्यांना पगार दिला जात नाही, आणि जे डॉक्टर काम करीत नाही, वैद्यकीय महाविद्यालयात येत नाही त्यांचे पगार सहजरित्या काढले जात आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.