शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
3
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
4
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
5
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
6
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
7
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
8
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
9
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
10
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
11
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
12
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
13
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
14
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
15
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
16
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
17
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
18
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
19
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
20
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?

६६० उमेदवारांचे भाग्य होणार यंत्रबद्ध

By admin | Updated: June 30, 2015 02:31 IST

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि आठही पंचाय समित्यांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी

आज मतदान : ६३१३ अधिकारी-कर्मचारी मतदान प्रक्रियेच्या कामात, मतपेट्यांसह केंद्रांवर रवाना

गोंदिया : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि आठही पंचाय समित्यांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.३०) ११०५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी रिंगणात असलेल्या २३७ आणि तर पंचायत समित्यांच्या १०६ जागांसाठी ४२३ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ४ लाख १४ हजार ३०२ पुरूष आणि ४ लाख ९ हजार १३१ महिला मतदार असे एकूण ८ लाख २३ हजार ४३४ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यासाठी गोंदिया तालुक्यात २६६ मतदान केंद्र, आमगाव तालुक्यात १३५, देवरी १०९, गोरेगाव ११६, तिरोडा १५०, सडक-अर्जुनी १०९, अर्जुनी मोरगाव १३२ तर सालेकसा तालुक्यात ८८ मतदान केंद्र राहणार आहेत. यात ११६४ मतदान केंद्राध्यक्ष, ३ हजार ४९२ मतदान अधिकारी तर बंदोबस्तासाठी एक हजार ६५७ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. तालुकानिहाय असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये गोंदिया तालुक्यात २६६ मतदान केंद्राध्यक्ष, ७९८ मतदान अधिकारी, २१ बस, ५० खासगी वाहने तर ५३२ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. आमगाव तालुक्यात १४९ मतदान केंद्राध्यक्ष, ४४७ मतदान अधिकारी, १३ बस, १७ खासगी वाहने तर १४७ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. सालेकसा तालुक्यात ८८ मतदान केंद्राध्यक्ष, २६४ मतदान अधिकारी, ९ बस, १३ खासगी वाहने तर ८८ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. तिरोडा तालुक्यात १६५ मतदान केंद्राध्यक्ष, ४९५ मतदान अधिकारी, १६ बस, १५ खासगी वाहने तर १२१ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. गोरेगाव तालुक्यात १२८ मतदान केंद्राध्यक्ष, ३८४ मतदान अधिकारी, ११ बस, २३ खासगी वाहने तर ११६ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. देवरी तालुक्यात १०९ मतदान केंद्राध्यक्ष, ३२७ मतदान अधिकारी, ११ बस, १६ खासगी वाहने तर १०९ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात १०९ मतदान केंद्राध्यक्ष, ३२७ मतदान अधिकारी, ८ बस, १६ खासगी वाहने तर २५९ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १५० मतदान केंद्राध्यक्ष, ४५० मतदान अधिकारी, १३ बस, २१ खासगी वाहने तर २८५ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. (जिल्हा/तालुका प्रतिनिधी)२९८ केंद्रांवर ३ पर्यंत मतदानजिल्हा नक्षलग्रस्त असल्याने २९८ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० पासून दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान करण्यात येणार आहे. त्यात आमगाव, देवरी व सालेकसा या तिन्ही तालुक्यातील संपूर्ण मतदान केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, गोठणगाव, बाराभाटी, ताडगाव, महागाव, केशोरी, भरनोली, सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, कोकणा जमी, शेंडा व बाम्हणी खडकी येथील मतदान केंद्रांवर दुपारी ३ पर्यंत मतदान सुरू राहणार आहे.पावसाच्या विश्रांतीने प्रशासनाला दिलासापावसाचे दिवस असल्यामुळे अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांचा पूर आल्यास मतदान यंत्रणेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता होती. त्यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केलेली असली तरी जास्त पाऊस आल्यास निवडणूक यंत्रणेचे टेन्शन वाढले असते. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस नसल्यामुळे यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. तरीही ईव्हीएम मशिन व कर्मचाऱ्यांना पोहोचविण्यासाठी आणि मतदानानंतर त्यांना पुन्हा सुरक्षितपणे परत आणण्यासाठी दुचाकी, ट्रॅक्टरसह बैलगाड्यांची व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे.चारही जिल्ह्यांच्या सीमेवर नाकाबंदी ४गोंदियासह लागून असलेल्या भंडारा, मध्यप्रदेशातील बालाघाट आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्याच्या सीमेवर नाकेबंदी करण्यात आली आहे. अवैधपणे दारूची वाहतूक आणि इतर कोणत्याही अनैतिक गोष्टींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे.