शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एमसीआयची टीम धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:32 IST

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची (एमसीआय) तीन सदस्यीय समिती पुन्हा एकदा गुरूवारी (दि.९) गोंदियात धडकली आहे. समितीने येथील वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थेचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, विद्यार्थी सुविधेवर समितीचा जास्त जोर दिसून आला. शिवाय, समितीने कुडवा येथील महाविद्यालयाच्या बांधकामाबाबत पाहणी केली.

ठळक मुद्देमहाविद्यालयातील व्यवस्थेचा आढावा : विद्यार्थी सुविधेवर दिसला समितीचा जोर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची (एमसीआय) तीन सदस्यीय समिती पुन्हा एकदा गुरूवारी (दि.९) गोंदियात धडकली आहे. समितीने येथील वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थेचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, विद्यार्थी सुविधेवर समितीचा जास्त जोर दिसून आला. शिवाय, समितीने कुडवा येथील महाविद्यालयाच्या बांधकामाबाबत पाहणी केली.तीन सदस्यीय समितीमध्ये ग्वालीयर येथील गजराज मेडीकल कॉलेजचे डॉ. भारत जैन, जामनगर येथील एम.डी.शाह मेडीकल कॉलेजचे डॉ. डी.वर्षावाडा व कर्नाटकातील बेल्लारी येथील विजयनगर मेडीकल कॉलेजचे डॉ. मल्लिकार्जुन एम. यांचा समावेश आहे. ही समिती गुरूवारी (दि.९) सकाळी गोंदियात आली व शुक्रवारीही (दि.१०) त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थेची माहिती घेतली. त्याचप्रकारे, वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत येत असलेल्या केटीएस रूग्णालयात मेडीकलच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बैठक व्यवस्थेची माहिती घेतली.शिवाय विविध विभागांत काय-काय सुविधा उपलब्ध करविण्यात आल्या आहेत याबाबत विचारपूस केली. कित्येक कर्मचाऱ्यांना त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल विचारणा केली. तसेच आतापर्यंत काय-काय व्यवस्था करण्यात आल्या आहेत व काही व्यवस्था न झाल्यास कशामुळे झाल्या नाही याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनासोबत विचारपूस केली. एवढेच नव्हे तर या समितीने बाई गंगाबाई महिला रूग्णालयातील व्यवस्थेचीही पाहणी केली. यादरम्यान अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच येणाºया समस्यांबाबत विचारणा करून त्यांना सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत हे ही जाणून घेतले.समितीने फुलचूर येथील आयटीआय व पॉलीटेक्नीक कॉलेजमध्ये असलेल्या हॉस्टलबाबत माहिती घेतली. एवढेच नव्हे तर जवळील ग्राम कुडवा येथील ज्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे त्याबाबत विचारणा केली. त्याचप्रकारे आतापर्यंत बांधकाम कशामुळे सुरू झाले नाही याबाबत विचारणा केली. तर सोबतच स्वत: जाऊन पाहणी केल्याचीही माहिती आहे.दरवर्षी होतो समितीचा दौराएमसीआयची एक समिती दर ६ महिन्यांत मेडिकल कॉलेजचा दौर करते. हा दौरा ५ वर्षे केला जात असून मेडीकल कॉलेजमध्ये आवश्यक सुविधा मिळवून देणे हा या मागचा उद्देश असतो. याबाबत समिती एक गोपनीय अहवाल तयार करून मेडीकल बोर्डाला सादर करते. याच अहवालाच्या आधारावर संबंधित मेडिकल कॉलेजला मंजुरी द्यायची की मंजुरी काढायची याचा निर्णय घेतला जातो. या दौºयात समितीने रूग्णालय परिसरात सुरू नवीन बांधकामांबाबत माहिती जाणून घेतली.

टॅग्स :Medicalवैद्यकीय