शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा खून करणाऱ्या पती व सासऱ्याला जन्मठेप

By admin | Updated: April 20, 2016 01:50 IST

विवाहितेचा खून करणाऱ्या पती व सासऱ्याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

गोंदिया : विवाहितेचा खून करणाऱ्या पती व सासऱ्याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर सुनावणी मंगळवारी जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीश एम.जी. गिरटकर यांनी केली.सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तुळमुळी चौकी विचारपूर येथील विवाहित महिला कमलाबाई रोमनलाल नागपुरे (२४) या हिचा घरगुती कलहातून खून झाला होता. या संदर्भात पती रोमनलाल बेनिराम नागपुरे (३०) व सासरा बेनिराम राधेलाल नागपुरे (६०) या दोघांनीच तिचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सन २००८ मध्ये कमलाबाईशी आरोपी रोमनलाल याचे लग्न झाले होते. लग्नानंतर पती पत्नीचा वाद झाल्याने कमलाबाई माहेरी गेली होती. चार महिने माहेरी राहिल्यानंतर राजनांदगावच्या कौटुंबिक न्यायालयातून तिला आपल्या घरी आणण्याचे ठरविले होते. तिला घरी आणल्यानंतर काही दिवसांनतर पुन्हा वाद सुरू झाला. २४ डिसेंबर २०१३ च्या रात्री ११ वाजतादरम्यान झालेल्या वादात बापलेकांनी गळा आवळून तिचा खून केला. तपास तत्कालीन ठाणेदार संदीप रणदिवे यांनी केला. १२ साक्षीदार तपासल्यावर या प्रकरणातील आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रूपये दंड ठोठावला आहे. सरकारी वकील अ‍ॅड.कैलाश खंडेलवाल यांनी युक्तीवाद केला. सीएमएस सेलचे राजकुमार कराडे यांनी पैरवी केली.मृतक व आरोपींच्या नखांवर रक्तपोलिसांनी या घटनेतील मृतक व आरोपी यांचे नख जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. मृताच्या चेहऱ्यावर नखाच्या जखमा व आरोपींच्या चेहऱ्यावरही जखमा आढळल्या होत्या. त्यांचे नख जप्त करून तपासणीसाठी पाठविल्यावर आरोपींच्या नखांवर मृतकाचे रक्त तर मृतकाच्या नखांवर आरोपींचे रक्त असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.