शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेतून विवाहिता गायब

By admin | Updated: January 13, 2016 02:18 IST

ओरिसा येथे आपल्या सासरी जाण्यास निघालेली विवाहित महिला धावत्या रेल्वेतून गायब झाली.

गोंदियाचे माहेर : ओरिसात जात होतीगोंदिया : ओरिसा येथे आपल्या सासरी जाण्यास निघालेली विवाहित महिला धावत्या रेल्वेतून गायब झाली. या विवाहित महिलेचे नाव प्रियंका केशवदास (२७) असून ती गोंदियावरून भुवनेश्वरला जात होती. ही घटना १० जानेवारी २०१६ रोजी घडली. सदर महिला काही दिवसांसाठी गोंदिया येथे आपल्या माहेरी रामनगर येथे आली होती. यानंतर ती गोंदिया स्थानकातून जोधपूर-पूरी एक्सप्रेसच्या (१८४७४) कोच एस ८ मधील बर्थ-५२ वर बसून भुवनेश्वरला आपल्या पतीच्या घरी जात होती. भुवनेश्वरच्या सत्यकाली बस्ती, काली मंदिरजवळ तिचे सासर आहे. ती ज्या गाडीने जात होती, त्याची माहिती तिने सासरच्या मंडळीस दिली होती. तिला घेण्यासाठी भुवनेश्वरच्या रेल्वे स्थानकात तिच्या सासरचे लोक आले होते. मात्र ती न आढळल्याने त्यांनी रेल्वे स्थानक व सदर रेल्वे गाडीच्या सर्व बोग्यांमध्ये शोध घेतला. मात्र प्रियंका कुठेच आढळली नाही. सदर महिलेचे लग्न सात वर्षांपूर्वी झाले असून तिला मुलबाळ नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. या प्रकाराची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांना देण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक यादव करीत आहेत. (प्रतिनिधी)