वऱ्हाड्यांची होरपळ : सकाळचे लग्न लागते दुपारी, दीर्घकाळ नृत्य होतेय प्रतिष्ठेचे लक्षणगोंदिया : लग्न समारंभाने केवळ दोन परिवारांचे नातेसंबंध जुळत नाही तर नातलगांसोबत मित्र, मैत्रिणींच्या भेटीगाठी तसेच ओळखी वाढतात. त्यामुळेच याला माध्यमही मानले जाते. बँडच्या तालावर उन्हाचे चटके खात नाचणे हा तरूणाईची हौस भागविण्याचा मुख्य भाग झाला आहे. मात्र या वातावरणात लग्नाच्या मुहूर्ताचा विसर पडत जात आहे. सकाळचे लग्न दुपारी तर सायंकाळचे लग्न रात्री उशिरा लागत आहेत. तरूणाईच्या मनमौजी कारभारमुळे लग्नातील वडीलधारे नातलग मात्र हताश होत असल्याचे चित्र सर्वत्र जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळत आहे.हिंदू विवाह पध्दतीमध्ये लग्नाच्या मुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे. लग्न जुळविण्यासाठी ज्या प्रकारे वर, वधूंचे लग्न जुळविण्यासाठी कुंडली मिळवणे महत्त्वाचे आहे. तसेच लग्नाच्या मुहूर्ताला देखील तितकेच महत्त्व आहे. मात्र लग्नात नाचत- गाजत वराची मिरवणूक काढण्याच्या नादात मुहूर्ताची आठवण वरांकडील तरूणांना राहत नाही. नातलग, मित्रांचे लग्न म्हणजे जवळच्या मित्रमंडळीकरिता मौजमजा व भेटीगाठी करण्याचे प्रमुख माध्यम असल्याचे मानले जाते.लग्नात वयोवृद्ध नातलग यावेळी नाराजी व्यक्त करतात. मात्र तरूणाईसमोर त्याचा नाईलाज असतो. लग्नाच्या मुहूतार्चा विसर प्रत्येकाला पडलेला आहे. २०-२५ वर्षांपूर्वी विविध समाजात बैलबंडीद्वारे वरात नेत असत. त्यासाठी पहाटेपासूनच तयारी केली जायची. परंतु आता वेळेवर वाहनांनी जाण्याची सवय लागली आहे. समाजातील लग्न मुहूर्तहीन झाले आहे. ‘लग्न एकदाच होते’ या समजामुळे तरूणाईचे लक्ष लग्नात केवळ मौजमजा करण्याकडे लागलेले असते. लग्न समारंभाच्या दिवशी सकाळच्या लग्नाला नियोजनानुसार वराकडील मंडळींनी लवकर यायला पाहिजे. मात्र लग्न मुहूर्ताच्यावेळी वराकडील मंडळी लग्नस्थळी येतात. त्यातच लग्नाचा मुहूर्त हरवला आहे. मात्र लग्नातील वऱ्हाड्यांना वर-वधूकडील पाहूणे मंडळीचा चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे लग्न मुहूर्ताची कुणालाही फिकीर नाही. यात वधुपक्षाकडील मंडळींना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. (वार्ताहर)
बँंडच्या तालात लग्नाचा मुहूर्त हरवला
By admin | Updated: May 7, 2015 00:37 IST