शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पणन विभागाने फिरविला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:45 IST

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकºयांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग फेडरेशने (पणन) ने मंगळवारी (दि.१६) काढले होते. यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

ठळक मुद्देबँक खात्याची सक्ती नाही : तांत्रिक चुकीमुळे झाला घोळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग फेडरेशने (पणन) ने मंगळवारी (दि.१६) काढले होते. यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आयएफसी कोड असताना सुद्धा ते नसल्याचे कारण पुढे केले होते.लोकमतने बुधवार (दि.१७) च्या अंकात या संदर्भात बातमी प्रकाशित करताच पणन विभागाला चूक लक्षात येताच त्यांनी काढलेले आदेश रद्द केले. जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक धानाची विक्री शासकीय धान खरेदी केंद्रावर करतात. या केंद्रावर शेतमालाची विक्री करणाºया शेतकºयांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातात. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचे बँक खाते हे जिल्हा बँकेत आहेत. शिवाय याच बँकेतून ते पीक कर्जाची उचल करतात. तसेच राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा जिल्हा बँकेची प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ आहे.त्यामुळे ही बँक शेतकऱ्यांना आपली वाटते. मात्र पणन विभागाने जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शासकीय धान खरेदी करणाऱ्या संस्थांना पत्र देवून शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य असल्याचे आदेश काढले. या पत्रात जिल्हा बँकेकडे आयएफसी कोड नसल्याचे कारण पुढे केले होते.विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे स्वत:चा आयएफसी कोड असून बँकेचे एटीएम सुध्दा जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आहे. शिवाय सर्वाधिक पीक कर्जाचे वाटप सुध्दा या बँकेकडून केले जाते. मात्र यानंतरही शासनाने जिल्हा बँकेत शेतकऱ्यांचे खाते असताना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याचे आदेश काढले.दरम्यान लोकमतने या संबंधिची बातमी गुरूवारच्या (दि.१७) अंकात प्रकाशित करताच पणन विभागाने काढलेले आदेश रद्द केले. तसेच शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाºया शेतकºयांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची सक्ती नसल्याचे सुद्धा स्पष्ट केले. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.विभाग म्हणतो समजण्यात चूकशासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाºया शेतकºयांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याचे आदेश पणन विभागाने काढले होते. तसेच याच आदेशात जिल्हा बँकेकडे आयएफसी कोड नसल्याने शेतकºयांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यास अडचण जात असल्याचे म्हटले होते. मात्र हा आदेश केवळ ज्या जिल्ह्यातील जिल्हा बँकेकडे आयएफसी कोड नाही, त्यांच्यासाठी असल्याचे सांगितले. तसेच आदेश काढताना कर्मचाऱ्याच्या समजण्यात चूक झाल्याने हा गोंधळ झाल्याचे या विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.जिल्हा बँककडे पूर्वीपासूनच आयएफसी कोडजिल्ह्यातील सर्वात मोठी आणि शेतकºयांची बँक म्हणून जिल्हा बँकेची ओळख आहे. या बँकेचे सर्वाधिक शेतकरी खातेदार असून बँककडे पूर्वीपासूनच आयएफसी कोडची सुविधा आहे. मात्र बँकेची दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जिल्हा बँकेच्या अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :bankबँक