शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाजार विभागाचीही वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:56 IST

नगर परिषदेची मालमत्ता कर वसुलीसाठी धडपड सुरू असतानाच आता नगर परिषदेच्या बाजार विभागानेही वसुलीसाठी कं बर कसली आहे.

ठळक मुद्दे२.१० कोटींचे टार्गेट : दुकान भाडे व सेवा कर

ऑनलाईन लोकमतगोंदिया : नगर परिषदेची मालमत्ता कर वसुलीसाठी धडपड सुरू असतानाच आता नगर परिषदेच्या बाजार विभागानेही वसुलीसाठी कं बर कसली आहे. नगर परिषदेच्या मालकीच्या दुकान गाळ््यांचे भाडे व सेवा कर वसुलीसाठी विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. बाजार विभागाला यंदा दोन कोटी १० लाख ४१ हजार ९८ रूपयांचे मागील थकबाकी व चालू मागणीचे टार्गेट आहे.मालमत्ता कर तसेच दुकान व इमारतींचे भाडे हे दोनच नगर परिषदेच्या सर्वाधीक उत्पन्नाचे स्त्रोत आहे. यामुळे दोन्ही विभागांची पुरेपूर वसुली होणे नगर परिषदेसाठी गरजेचे आहे. आतापर्यंत नगर परिषदेचे मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष राहत होते. तर बाजार विभागाच्या या उत्पन्नाकडे तेवढे काही लक्ष दिले जात नव्हते असेच काही दिसत होते. यंदा मात्र नगर परिषदेचे उत्पन्न जास्तीत जास्त वाढावे यासाठी बाजार विभागानेही वसुलीसाठी कंबर कसली आहे.नगर परिषद बाजार विभागाला यंदा मागील थकबाकी व चालू मागणी असे एकूण दोन कोटी १० लाख ४१ हजार ९८ रूपये वसुलीचे टार्गेट आहे. यात आतापर्यंत फक्त ५२ लाख ८७ हजार ३१५ रूपयांची वसुली झाल्याची माहिती आहे. यंदा काहीही करून उरलेल्या २७ दिवसांत हे टार्गेट सर करण्यासाठी प्रभारी बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा आपल्या सहकाºयांना घेऊन मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी १ मार्चपासून बाजार विभागाची विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे.शहरात पालिकेच्या १०७५ मालमत्ताबाजार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात नगर परिषदेच्या मालकीचे १०७० दुकान गाळे, ४ इमारती व १ मोबाईल टॉवर आहे. या सर्वांचे भाडे व सेवा कर वसुलीची जबाबदारी बाजार विभागाकडे आहे. मात्र बाजार विभागाकडे वसुलीसाठी फक्त दोनच कर्मचारी असल्याने वसुलीचे काम पाहिजे तसे होत नव्हते. यासाठी यंदा बाजार विभागाने कंत्राटी तत्वावर चार माणसे घेतली असून त्यांच्यासह प्रभारी बाजार निरीक्षक मिश्रा व दोन वसुली कर्मचारी वसुलीसाठी फिरत आहेत.अन्यथा सिलींग व कायदेशीर कारवाईनगर परिषदेच्या वसुलीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून येत्या ३१ तारखेपर्यंत पूर्ण वसुली करणे गरजेचे आहे. यामुळे बाजार विभाग जास्तीत जास्त वसुलीसाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी शहरात मुनादी केली जात असून ३१ तारखेपर्यंत थकबाकीदारांनी त्यांच्याकडील थकबाकी व भाडे भरावे असे कळविले जात आहे. अन्यथा सिलींगची कारवाई केली जाणार असून त्यांचे दुकान व इमारतीचा लिलाव करून संबंधीतांचा कब्जा संपुष्टात आणला जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगीतले.