शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

घोषणांचाच बाजार; फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST

गोंदिया : राज्यात कोरोना रुग्णवाढ चिंताजनक वेगाने हाेत असल्याने कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द ...

गोंदिया : राज्यात कोरोना रुग्णवाढ चिंताजनक वेगाने हाेत असल्याने कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत महिनाभराची संचारबंदी लागू केली आहे. १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून तर १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीमुळे तळहातावर कमावून खाणाऱ्या फेरीवाल्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक फेरीवाल्याला १५०० रुपये मदत देण्याचे जाहीर केले; परंतु शहरातील एकाही फेरीवाल्याला अद्याप कवडीची मदत मिळाली नाही.

राज्य सरकारने कोरोना रोखण्यासाठी उचललेले पाऊल योग्य आहे; परंतु या संचारबंदीचा फटका गरीब आणि कष्टकरी वर्गाला बसतो. यासाठी मुख्यमंत्र्यांनी ५४७६ कोटींची विशेष मदत जाहीर केली. या मदतीचा एक भाग म्हणून राज्यातील पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये दिले जाणार आहेत; परंतु गोंदिया जिल्ह्यातील एकाही फेरीवाल्यांला याचा फायदा मिळाला नाही. गोंदिया जिल्ह्यात दोन हजारावर फेरीवाले आहेत; परंतु ७५० फेरीवाल्यांची नाेंदणी आहे.

......

फेरीवाले म्हणतात

मी महिनाभरापासून १ रुपयाही कमावला नाही. त्यामुळे घरातील लोकांचे पोट कसे भरावे, हा प्रश्न आहे. घराबाहेर गेलो तर कोरोनाची भीती. घरात राहिले तर उपाशी राहण्याची भीती आहे. शासनाने मदत तर जाहीर केली; परंतु आम्हाला मिळते की नाही, ते माहिती नाही.

- रोहिनाथ सदगीर, फेरीवाला.

........

कोरोनाला पाहून संचारबंदी लागली; पण आमच्या समस्या वाढतच आहेत. हातात पैसा नाही, कामही नाही त्यामुळे पोट कसे भरावे हा प्रश्न आहे. शासनाची मदत मिळेल की नाही माहिती नाही. कशी मिळेल आणि केव्हा मदत मिळेल हे कुणास ठाऊक.

- विठ्ठल पाथोडे, फेरीवाला.

.........

कोरोनाला आळा घालण्यासाठी संचारबंदी लावणे आवश्यक आहे; परंतु कमावून खाणाऱ्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटविणे तेही अत्यावश्यक आहे. सरकारने फेरीवाल्यांना १५०० रुपये मदत देण्याचे ठरविले; परंतु आम्ही फेरीचे काम करून कुठेच नोंदणी केली नाही. त्यामुळे मदत मिळणार की नाही हे सांगता येत नाही.

- संजयसिंह पुरोहित, फेरीवाला.

......

जिल्ह्यातील नोंदणीकृत फेरीवाल-७५०

नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांची संख्या- १२५०

.....