शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

इंग्रजी शाळांच्या वर्चस्वामुळे मराठी शाळा माघारल्या

By admin | Updated: July 26, 2015 02:08 IST

नगर प्रशासन अपयशी : इंग्रजी शाळांकडे वाढला कल

गोंदिया : शहर परिसरात इंग्रजी शाळांचे वर्चस्व दिसून येत आहे. गोंदिया विभागात अनेक इंग्रजी शाळा सुरू असून पुन्हा नवीन शाळा सुरू होत आहेत. या शाळा सर्रासपणे शासकीय नियमांची अवहेलना करतात. आपल्या मनाप्रमाणे मासिक, वार्षिक शुल्क आकारणी करतात. कोणतीही शाळा शिक्षण विभागाच्या मान्यतेशिवाय सुरू करता येत नाही. मात्र काही शाळांना मान्यतासुद्धा नाही. अनेक शाळांमध्ये शैक्षणिक सोर्इंचा अभाव दिसून येतो. शाळेचे पटांगण, खेळाच्या सोई, विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी वर्तमानपत्रे, चर्चासत्रासाठी वेगळी व्यवस्था यांचा अभाव सातत्याने दिसून येतो. विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी भपकेबाज जाहिराती देण्यात येतात; पण प्रत्यक्षात असे दिसून येत नाही. या शाळांवर राजकीय पुढाऱ्यांचे वरदहस्त असल्यामुळे शिक्षण विभागही कारवाई करण्यात आपली असमर्थता दर्शवित असतो. शहरी परिसरातील पालक आपल्या पाल्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे म्हणून नेहमी जागरूक असतो. जर चांगल्या प्रतिचे शिक्षण मिळत असेल तर त्यानुसार शुल्क आकारण्यात येते. त्यापेक्षा जास्त खर्च एखाद्या चांगल्या शाळेत करावा लागत असेल तर पालक तयारी दर्शवितातात. याचा फायदा काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा घेताना आपल्यास दिसून येतात. अशा शाळांकडृून नियमांची अवहेलना केली जाते. शिक्षण विभागाची मान्यता घेतलेल्या किती आणि मान्यता न घेतलेल्या किती शाळा आहेत, याकडे शिक्षण विभागाने लक्ष घालणे आवश्यक आहे. शिक्षण उपसंचालक यांनी निर्धारित केलेल्या शुल्कानुसार आकारणी करावी लागते. पण या शाळा आपण शासनाकडून अनुदान घेत नाही म्हणून आपल्यावर कोणतेच बंधन नाही, अशी सफाई देत असतात. राजकीय वर्चस्वातून या शाळा मिळालेल्या असतात. या कारणाने त्या आपल्याला मान्यता जरूरी आहे, हे जुमानत नाही. बहुतेक शाळा सीबीएससी पॅटर्न आणि जाहिरात दाखवितात; पण त्यांनी सीबीएससीची रितसर मान्यता घेतलेली नसते. काही शाळांत शैक्षणिक सोर्इंचा अभाव जास्त दिसून येतो. शाळेच्या खोल्या मोठ्या नसतात. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी एका वर्गात बसविले जातात. फर्निचरची व्यवस्था तुटपुंजी असते. खेळाचे मैदान नसते. चर्चासत्रासाठी स्वतंत्र खोली, वृत्तपत्र वाचण्यासाठी वेगळी व्यवस्था, प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव या शाळांमधून दिसून येतो. विद्यार्थी आपल्या शाळेकडे आकृष्ट व्हावेत यासाठी जाहिरातीत अनेक उपक्रम दर्शविले जातात. प्रत्यक्षात जाहिरातीत वरच्या भागावर ‘सीबीएससी पॅटर्न’ असे लिहिलेले असून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाची सोय, प्रशस्त आवार, खेळाचे मैदान, स्वतंत्र वाचनालय अशा अनेक सोई दर्शविण्यात येतात; पण वास्तविक चित्र वेगळेच असते. सदर शाळांना जि. प. व उपसंचालक शिक्षण विभाग यांची मान्यता आवश्यक असते. शिक्षण उपसंचालक कार्यालय मान्यतेविषयी वेळोवेळी कारवाई करते. अशा शाळांवर राजकारणी लोकांचा हात असतो. वरूनच दबाव येत असल्यजाने शिक्षण विभागदेखील हतबल होतो. आणि शेवटी जसे आहे तसे चालू राहू द्या, यानुसार शिक्षण विभागाची कारवाई सुरू असते. त्यामुळे ही विद्यालये सामान्य वर्गातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी की श्रीमंत वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असा प्रश्न जनसामान्यांना पडतो. (तालुका प्रतिनिधी)