शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

शिबिरातून अनेकांचे समाधान

By admin | Updated: October 8, 2015 01:32 IST

महसूल विभाग प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. या विभागाशी संबंधित शेतकरी व सामान्य जनतेचे प्रश्न निकाली काढण्यासाठी महसूल प्रशासन अधिक गतीमान,

महाराजस्व अभियान : जात, रहिवासी व उत्पन्नाचे दाखले वाटप; १३०० फेरफार निकालीगोंदिया : महसूल विभाग प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. या विभागाशी संबंधित शेतकरी व सामान्य जनतेचे प्रश्न निकाली काढण्यासाठी महसूल प्रशासन अधिक गतीमान, लोकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी महाराजस्व अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम जिल्ह्यात १ आॅगस्ट या महसूल दिनापासून राबविण्यात येत आहे. विविध दाखले शिबिरांसह विस्तारित समाधान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे दोन महिन्यांत महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून अनेकांचे समाधान करण्यात आले. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आठही तालुक्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात विविध दाखले वाटपाचे शिबिर, विस्तारित समाधान योजनेचे शिबिर, महसूल अधिकाऱ्यांकडील अर्धन्यायीक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महसूल अदालती, फेरफार अदालती, भूसंपादन केलेल्या प्रकरणी कमी जास्त प्रकरणे तयार करून गाव दफ्तरी सर्व उतारे योग्यप्रकारे सुधारित करणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित बंद झालेले गाडी रस्ते, अनधिकृत अकृषक वापराबाबत शोध मोहीम राबविणे व निकाली काढणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासन मोहीम राबविणे, इनाम व वतन जमीन शर्तभंग तपासणी व कार्यवाही करणे आणि चावडी वाचन करण्याचे काम करण्यात आले. विविध प्रकारचे दाखले देण्यात येणाऱ्या शिबिरातून एक हजार ९७३ व्यक्तींना जातीचे दाखले, एक हजार ५९७ जणांना रहिवासी असल्याचे दाखले तर पाच हजार २३८ व्यक्तींना उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले. विस्तारित समाधान योजनेच्या १८ शिबिरांत नागरिकांचे दोन हजार ८८४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार ७७५ दाखल्यांचे वाटप नागरिकांना करण्यात आले. महसूल अधिकाऱ्यांकडील प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी ७७ महसूल अदालती आयोजित करण्यात आल्या. या अदालतीमध्ये सहा महिन्यांपेक्षा प्रलंबित तीन हजार ३७१ प्रकरणे होती. त्यापैकी ३५९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. एक महिन्यापेक्षा जास्त प्रलंबित असलेल्या फेरफारपैकी एक हजार ३०० फेरफार निकाली काढण्यात आले. यासाठी ६५ फेरफार अदालती घेण्यात आल्या. मागील दोन महिन्यात २१ पांदण रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली असून जवळपास १२ किमी रस्ते मोकळे करण्यात आले. अभियानाच्या माध्यमातून विविध दाखले शिबिर, विस्तारित समाधान शिबिर, फेरफार निकाली काढण्यासाठी मंडळ स्तरावर फेरफार अदालती, पांदण रस्ते मोकळे करणे, अकृषक वापराच्या प्रकरणांची शोध मोहीम, चावडी वाचन करण्यात आल्यामुळे महसूल विभागाशी संबंधित कामे त्वरित पूर्ण करण्यात आल्यामुळे संबंधित वेळेची व पैशाची बचत होण्यास मदत झाली. (प्रतिनिधी)