शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र तुरकरसह अनेकांचा भाजप प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2017 00:13 IST

पं. दिनदयाल उपाध्याय जनशताब्दी वर्ष व शिवार संवाद सभेच्या माध्यमातून दासगाव येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पं. दिनदयाल उपाध्याय जनशताब्दी वर्ष व शिवार संवाद सभेच्या माध्यमातून दासगाव येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य व माजी जि.प.सदस्य नरेंद्र तुरकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामामुळे प्रभावीत होऊन आ. डॉ. परिणय फुके व माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला. नरेंद्र तुरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला भाजपचे महामंत्री बाळा अंजनकर, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, ग्रामीण तालुका मंडळाचे अध्यक्ष छत्रपाल तुरकर, धनंजय तुरकर, भाजप तालुकाध्यक्ष नंदू बिसेन, भाऊराव उके, राजेश चतुर, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, सुजित येवले उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आ. परिणय फुके यांनी विकास व परिवर्तन होत असल्याचे सांगून घराघरापर्यंत शासकीय योजना पोहचवीत असल्याचे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुशासनामुळे भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्यास आला आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत आहे. दासगाव, काटी, जि.प.क्षेत्रातील बुथाना मजबूत करण्यासाठी शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी यावेळी नरेंद्र तुरकर व इतर पदाधिकाऱ्यांवर टाकली आहे. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले. बनाथर येथील मरार समाजभवनात आयोजित शिवार संवाद सभेत धामणगावचे बजरंग ठाकरे, अनिल पारधी, गणेश मरठे, सिताराम नेवारे, रद्दू सलाम, प्रदीपसिंह चौव्हाण, आशिषसिंह चौव्हाण, तिलक खरे, गजेंद्र नागव, छबीलाल बर्वे यांनी यावेळी प्रवेश केला.