शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 22:00 IST

ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब कुटुंबांकरीता शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. मात्र या योजनेच्या लाभापासून अनेक कुटुंब वंचित असल्याची बाब उघडकीस आली आहे. या योजनेत पात्र-अपात्र कुटुंबांचे सर्वेक्षण मागील अनेक वर्षांपूर्वी करण्यात आले होते.

ठळक मुद्देमागणी : ग्रामपंचायत पातळीवर चौकशी करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब कुटुंबांकरीता शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. मात्र या योजनेच्या लाभापासून अनेक कुटुंब वंचित असल्याची बाब उघडकीस आली आहे.या योजनेत पात्र-अपात्र कुटुंबांचे सर्वेक्षण मागील अनेक वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यात अनेक कुटुंब पात्र असूनही त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे ते कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत पातळीवर अति गरजू लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून लाभ देण्यात यावी, अशी मागणी वंचित लाभार्थी कुटुंबीयांनी केली आहे.आवास योजनेकरिता पूर्वी झालेल्या सर्वेक्षणात अनेक चुका करून पात्र लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले.पात्र लाभार्थ्यांची नावे ग्रामपंचायत रेकॉर्डवर नोंद नसतानाही त्यांच्या नावे योग्य घर असल्याचे दर्शवून त्यांना अपात्र ठरविण्यात आले. ती यादी अंतिम मंजुरीकरिता तालुकापातळीवर सादर करण्यात आली. त्यामुळेच अति गरजू लाभार्थ्यांवर आवास योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.संबंधित विभागाने या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाची दखल घेवून उपाययोजना करावी, अशी मागणी वंचितांकडून करण्यात आली आहे.उज्ज्वला गॅस कनेक्शनची प्रतीक्षाग्रामीण भागातील गरीबांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी, वृक्ष कटाईवर आळा बसावा, याकरिता ग्रामीण भागासाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली. मात्र गॅस एजेंसीच्या दिरंगाईमुळे अनेक कुटुंब गॅस योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. उज्ज्वला गॅस कनेक्शन मिळवून घेण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून गरजू लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून रितसर अर्ज केले आहेत. पण अद्याप त्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले नाही. महिलांना धुराचा त्रास होणार नाही, कमी वेळेत स्वयंपाक करणे शक्य होईल, वृक्षतोडीवर आळा बसेल, या हेतूने ही योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गॅस एजेंसी शासनाच्या उद्देशाची अवहेलना करीत असल्याचे लाभार्थी बोलतात. ही योजना राबविणारी यंत्रणा याच गतीने कार्य करेल तर गरजू लाभार्थ्यांना पाच वर्षांपर्यंतही गॅस कनेक्शन उपलब्ध होणार नाही. त्यामुळे वंचित लाभार्थ्यांमध्ये शासन-प्रशासना विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना