गोंदिया : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी राज्यमंत्री केवलचंद जैन यांना सोमवार ३ आॅक्टोबर रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघालेली अंतिम यात्रा नेहरू चौकात आल्यानंतर शोकसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ.नितीन राऊत होते. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री भरतभाऊ बहेकार, बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार दिलीप बंसोड, माजी आमदार हरिहरभाई पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बाबा कटरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले, भंडारा जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, रजनी श्रीकांत जिचकार यांनी केवलचंद जैन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. खासदार नाना पटोले यांचा शोकसंदेश अपूर्व अग्रवाल यांनी वाचून दाखिवला. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी के.डी.मेश्राम, तहसीलदार अरविंद हिंगे यांनी पुष्पचक्र वाहिली. यावेळी जि.प.अध्यक्ष उषााताई मेंढे, माजी आमदार रामरतन राऊत यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती व नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जैन यांच्या निवासस्थानी पार्थिवाचे दर्शन घेतले. पोलिसांनी बंदूकीने हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. शेवटी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.अजय केविलया यांच्याकडे पार्थिव सोपविण्यात आले. संचालन अमर वराडे व अपूर्व अग्रवाल यांनी केले.
शोकसभेला अनेकांची उपस्थिती
By admin | Updated: October 4, 2016 01:15 IST