शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून लावलेली रोपटी वनरक्षकाने उपटून फेकली

By admin | Updated: September 12, 2016 00:25 IST

कोहमारा सहवनक्षेत्रातील वनरक्षकाने गावकऱ्यांनी लावलेली झाडे उपटून फेकणे महागात पडू शकते.

अतिक्रमणही वाढले : ‘मालसुतो’ अभियान राबविणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करासडक-अर्जुनी : कोहमारा सहवनक्षेत्रातील वनरक्षकाने गावकऱ्यांनी लावलेली झाडे उपटून फेकणे महागात पडू शकते. त्या वनरक्षकाला निलंबित करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.सडक-अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनरक्षक शिवा तांडेकर यांनी दबंगगिरी करुन वनसमिती व गावकऱ्यांच्या लोकसहभागातून लावलेलीे सागवान, शिसम, करंजी आदी झाडे उपटून फेकण्याचा प्रकार वडेगाव येथील गट नं. ५१७ मध्ये घडला आहे. शिवा तांडेकर हे रुजू होऊन तीन वर्षे झाले. तांडेकर यांच्या आशीर्वादाने जवळ-जवळ २५ एकर जमीन अतिक्रमण काढले आहे. अतिक्रमण काढणाऱ्यांकडून काही आर्थिक भ्रष्टाचार केल्याची चर्चा तालुक्यात आहे. जर तत्पर वनरक्षक राहिले असते तर २५ एकराच्या वनजमिनीत अतिक्रमण झालेच नसते. त्यात वनरक्षकाने ‘मालसुतो’ अभियान राबवल्याचे दिसत आहे. पटाची दानच्या गट नं. ५१७ मध्ये वनसमिती व गावकऱ्यांनी अतिक्रमण न झालेल्या जमिनीत कुणी अतिक्रमण करू नये व पर्यावरणाच्या शतकोटी वृक्ष लागवडीला सहकार्य करून झाडे लावण्याचा संकल्प केला. लोकसहभागातून झाडे लावण्यात आली. वनसमितीचे अध्यक्ष नाजूक चुटे, दक्षता समितीचे अध्यक्ष राजेश मुनिश्वर, उपसरपंच राजेंद्र खोटेले, शिशुपाल हत्तीमारे आदी गावकऱ्यांना न विचारता वनरक्षक तांडेकर, वनमजूर बनकर व त्यांचा एक सहकारी यांनी जोशात येऊन झाडे उफटून फेकली.सदर घटनेची माहिती कोहमाराचे क्षेत्र सहायक सुनील खांडेकर यांना देताच त्यांनी वडेगाव ग्रामपंचायत गाठून गावकऱ्यांची समजूत घातली. वनसमिती व गावकऱ्यांनी त्या वनरक्षकाला वनमजुरावर कारवाई करण्याची मागणी केली. दक्षता समितीचे अध्यक्ष राजेश मुनिश्वर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, गोंदियाचे उपविभागीय वन अधिकारी यु.टी. बिसेन यांना दूरध्वनीवर घटनेची माहिती देऊन सदर कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. कर्मचाऱ्यांचे निलंबन न केल्यास मुख्य वनसरंक्षक वनवृत्त प्रादेशिक नागपूर यांना लेखी तक्रार करणार आहेत. सदर कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकरण वनकर्मचाऱ्यांच्या अंगलट येऊ नये यासाठी वरिष्ठाचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. शासनाच्या धोरणानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शतकोटी वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जागा मिळेल तिथे वृक्ष लागवडीचे धोरण अवलंबिले आहे. पण लोकसहभागातून लावलेले झाडे उपटून फेकणाऱ्या वनकर्मचाऱ्याला हे का कळले नाही, हा संशोधनाचा विषय आहे. वडेगावात मात्र जागा मिळेल तिथे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न वनरक्षकांच्या आशीर्वादाने होत आहे. अतिक्रमण काढण्यासाठी काही रक्कमही मोजून द्यावी लागल्याची चर्चा अतिक्रमण काढणाऱ्यांकडून होत आहे.(शहर प्रतिनिधी)