शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

घाटाची लिलाव प्रकिया रखडल्याने मालसुतो अभियान झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

अवैधरित्या रेती वाहून नेणारे व्यावसायिक प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचे खिसे गरम करून राजरोसपणे अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातून गाढवी नदी वाहत असल्याने रेतीची उपलब्धता फार मोठी आहे. परंतु यावर्षी कोणत्याच रेती घाटाचे लिलाव झाले नाहीत. लिलाव प्रक्रिया गेल्या एक वर्षीपासून रखडली आहे.

ठळक मुद्देरेती माफीयांना आले सुगीचे दिवस : शासनाचा महसूल पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडल्यामुळे शासनाचा महसूल बुडाला आहे. मात्र, अवैधरित्या रेती वाहून नेणाऱ्या व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी ज्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेच मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे. या संधीचा फायदा घेऊन काही जणांनी मालसुतो अभियान सुरू केल्याची माहिती आहे. अवैधरित्या रेती वाहून नेणारे व्यावसायिक प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचे खिसे गरम करून राजरोसपणे अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातून गाढवी नदी वाहत असल्याने रेतीची उपलब्धता फार मोठी आहे. परंतु यावर्षी कोणत्याच रेती घाटाचे लिलाव झाले नाहीत. लिलाव प्रक्रिया गेल्या एक वर्षीपासून रखडली आहे. वास्तविक पाहता शासन प्रत्येक गावात घरकुल योजना राबवून मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रटीची  घरे बांधून देत आहे. त्यासाठी आवश्यक असलेला प्रमुख घटक रेती आहे. रेतीशिवाय घर बांधणी शक्य नाही. त्यामुळे रेती घाटांचे लिलाव होणे अत्यंत महत्त्वाचे होते. मात्र, अजूनही या परिसरातील कोणत्याही रेती घाटाचे लिलाव झाले नाही. त्यामुळे अवैधरित्या रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. हे रेती चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी ज्या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचारी योग्य प्रकारे आपली जबाबदारी पार पाडीत नसतील तर अवैध  रेती वाहतुकीवर आळा कोण लावेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अवैध रेती वाहतूक करणारे व्यावसायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना चूप बसविण्यासाठी खिसे गरम करीत चर्चा आहे. रेती घाट लिलाव न झाल्यामुळे अनधिकृत पैसे कमावण्याची संधी संबंधीत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली आहे.  

कुंपणच शेत खात असेल तर...- अवैध रेती वाहून नेणाऱ्या व्यावसायिकांना रोखण्यासाठी शासनाने कितीही जबरदस्त उपाययोजना राबविल्या तरी त्या अपयशी ठरल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी कर्तव्यनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. त्याशिवाय अवैध रेती वाहून नेणाऱ्या व्यावसायिकांवर चाप लागणार नाही तसेच बरोबर रेती घाटांचे लिलाव होणे अपेक्षित आहे. त्याशिवाय अवैधरित्या रेती चोरीचे प्रमाण कमी होणार नाही.

 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया