शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात घटतेय कुपोषणाचे प्रमाण

By admin | Updated: May 21, 2016 01:44 IST

आदिवासी व नक्षलष्दृट्या अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात आता कुपोषणाचे प्रमाण कमी होत आहे.

सुधारणा दृष्टिपथास : कमी वजनाच्या श्रेणीत ९८८ तर अतितीव्र श्रेणीत १६६ बालकेगोंदिया : आदिवासी व नक्षलष्दृट्या अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात आता कुपोषणाचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्यात कमी वजनाच्या श्रेणीत ९८८ बालके असून कुपोषणात बऱ्याच प्रमाणात सुधार झाला आहे. अति तीव्र श्रेणीत १६६ बालके असून त्यातही मोठ्या प्रमाणात स्थिती सुधाारली आहे. बाल मृत्यू, उपजत मृत्यू यांच्यातही सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात ५ हजार ८१२ बालकांचे वजन कमी आढळले. त्यात १११२ बालक कुपोषणाच्या अतितिव्र्र श्रेणीत आले होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६६९ आंगणवाड्यातील शुन्य ते पाच वर्षातील ८७ हजार ६४२ बालकांचे एप्रिल महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले. शुन्य ते सहा वर्षातील एक लाख ३ हजार ४६४ बालकांचा समावेश होता. यातील ० ते ५ वर्षापर्यंत ८६ हजार ६७० मुलांचे वजन करण्यात आले. १६ हजार ७९४ बालकांचे वजन करण्यात आले नाही. यात ८० हजार ८९९ म्हणजे ९३.३४ टक्के बालक सामान्य आढळले. ४ हजार ८२५ म्हणजे ५.५७ टक्के बालक कमी वजनाच्या श्रेणीत तर ९४६ म्हणजे १.०७ बालके अतितिव्र कमी वजनाची आढळली. परंतु मार्च महिन्यात ५ हजार ८१५ म्हणजे ५.७५ टक्के बालक कमी वजनाचे असल्याचे लक्षात आले. १११२ म्हणजे १.१० टक्के बालक अतितिव्र कमी वजनाचे असल्याचे लक्षात आले. सॅम व मॅम श्रेणीत अनुक्रमे ७६ व २९४ बालके आढळले. एप्रिल महिन्यात ही आकडेवारी कमी होऊन अनुक्रमे ७५ व २७१ राहीली. (तालुका प्रतिनिधी)सालेकसात वाढले कुपोषणजिल्ह्याच्या सालेकसा तालुक्याला सोडून इतर तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण कमी आहे. एप्रिल महिन्यात अर्जुनी मोरगाव येथे १८१, गोंदिया १६७, आमगाव १२५, सालेकसा ११९, सडक अर्जुनी ९९, तिरोडा ९९, गोरेगाव ८६ व देवरीत ७० बालके अतितिव्र श्रेणीत आढळले. परंतु मार्च महिन्यात अर्जुनी मोरगावात २१०, आमगाव १४३, सालेकसा ९८, सडक अर्जुनी १११, गोरेगाव १२०, गोंदिया १९५, तिरोडा १३० व देवरी तालुक्यात १०५ बालक अतितिव्र श्रेणीत आढळले. कुपोषणाने ६ बालकांचा मृत्यूकुपोषणच्या सॅम-मॅम श्रेणीत सर्वाधिक कुुपोषित बालके अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७२ आढळले. सडक अर्जुनी ५८, आमगाव ४४, गोंदिया ४०, गोरेगाव २८, सालेकसा ३०, देवरी ३७ व तिरोडात १४ बालके सॅम-मॅम श्रेणीत आढळले. एप्रिल महिन्यात १ हजार २४९ बालकांनी जन्म घेतला. त्यात तीन दिवसाच्या १२०९ बालकांचे वजन घेण्यात आले. त्यात ५० बालकांचा २५०० ग्रॅम वजन आढळले. छाप उपजत मृत्यू तर ६ बालकांचा कुपोषणाने मृत्यू आहे.