शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पुरूष नसबंदीत गोंदिया राज्यातून दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 01:16 IST

सन २०१६-१७ मध्ये पुरूषांची नसबंदी करण्यात गोंदिया जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे.

आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते सत्कार : आठ हजार ४२६ महिला-पुरूषांच्या शस्त्रक्रियालोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २०१६-१७ मध्ये पुरूषांची नसबंदी करण्यात गोंदिया जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. त्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. जि.प. गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी. निमगडे यांनी गौरव चिन्ह स्वीकारले.याप्रसंगी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, खा. अरविंद सावंत, आरोग्य सचिव डॉ. विजय सतबीरसिंग, संचालक डॉ. सतीश पवार, उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल आदी उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात नऊ हजार २०० इतके कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट दिले होते. या कालावधीत आरोग्य यंत्रणेने जिल्हाभरातील आठ हजार ४२६ जणांच्या शस्त्रक्रिया केल्या. यात एक हजार ५३४ पुरूष व सहा हजार ८९२ महिलांचा समावेश आहे. लहान कुटुंबाबाबत जनजागृती होत असल्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढले आहे. मात्र यामध्ये स्त्रियांचीच नसबंदी करण्याचे प्रमाण राज्यभरात अधिक आहे. स्त्री नसबंदीच्या तुलनेत पुरूषांची नसबंदी सोपी व कमी त्रासदायक आहे. त्यामुळे पुरूषांच्या नसबंदीचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने याबाबत जनजागृती केल्याने पुरूषांच्या नसबंदीचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात सुमारे एक हजार ५३४ पुरूषांनी नसबंदी केली आहे.