शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर मलेरियाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:47 IST

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीचे बांधकाम अद्यापही सुरू झाले नाही.

ठळक मुद्दे सोयी सुविधांकडे दुर्लक्ष : मच्छरदाण्यांची सोय नाही

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीचे बांधकाम अद्यापही सुरू झाले नाही. परिणामी मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय वसतिगृह म्हणून कारंजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत केली. मात्र या इमारतीच्या परिसरात गवत आणि केरकचरा असल्याने वसतिगृहातील भावी डॉक्टरांनाच मलेरियाची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय व केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय (वसतिगृह) कारंजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत करण्यात आली आहे. पण, इमारतीच्या आजू-बाजूला सर्वत्र झाडे-झुडुपे, गवत, कचरा वाढला आहे. या परिसरात केरकचरा आणि घाणीचे साम्राज्य असल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी नवीन खाटा, गाद्या आल्या आहेत. या इमारतीच्या अनेक खिडक्यांमधील काचा फुटल्याने डास खिडक्यांमधून डास आत प्रवेश करतात.विद्यार्थ्यासाठी मच्छरदाण्या नाहीत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आकारले जाणारे शुल्क देखील भरतात. मात्र यानंतरही त्यांना सोयीसुविधा देण्याकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करित असल्याचे चित्र आहे.जिल्ह्याच्या हिवताप रूग्णांच्या संख्येत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थीची भर तर पडणार नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. मंगळवारपासून मेडिकल कॉऊन्सिलची चमू वैद्यकीय महाद्यालयाची पाहणी करण्यासाठी आली असल्याने वसतिगृहात स्वच्छता दिसून आली. परंतु काही नळांना पाणी येत नव्हते. गणेशोत्सव व सलग चार दिवस सुट्टी असल्याने या वसतिगृहातील विद्यार्थी चार दिवसासाठी गावाला गेले आहे.मात्र मेडिकल कॉन्सिलची चमू येणार असल्याचा सुगावा आधीच प्रशासनाला लागल्याने त्यांनी वसतिगृहाचा परिसर चकाचक करुन ठेवल्याचे बोलले जाते. दरम्यान पाहणीसाठी आलेली चमू यासर्व गोष्टींची दखल घेणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.रजेगाव ग्रामीण रुग्णालयाची पाहणीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दौºयावर आलेली मेडिकल कॉऊन्सिल आॅफ इंडियाची चमू बुधवारी रजेगावच्या ग्रामीण रूग्णालयात पोहचली. रजेगावच्या ग्रामीण रूग्णालयात भविष्यात डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ५ वर्षाचे एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर रजेगाव येथील प्रशिक्षण केंद्रात पाठविले जाणार आहे. त्याच अनुषंगाने चमू येथील सोयी सुविधांचा आढावा घेतल्याची माहिती आहे.