शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

येगाव पॉलिथीनमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:36 IST

गाव स्वच्छ करण्यासाठी सरसावलेल्या ‘नो स्पीच ग्रुप’ने गाव पॉलिथीनमुक्त करण्याची मागणी केली असून यासाठी सरपंचांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्दे‘नो स्पीच ग्रुप’ची मागणी : सरपंचांना दिले मागणीचे निवेदन

ऑनलाईन लोकमतइसापूर : गाव स्वच्छ करण्यासाठी सरसावलेल्या ‘नो स्पीच ग्रुप’ने गाव पॉलिथीनमुक्त करण्याची मागणी केली असून यासाठी सरपंचांना निवेदन दिले आहे. यात त्यांचा खर्रा पन्नीवर जोर असून ग्रुपच्या या चिमुकल्यांनी मागणीवर त्वरीत कारवाईची मागणी केली आहे.गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी ‘नो स्पीच ग्रुप’ तयार केला असून दोन तास गावासाठी उपक्रम ते राबवीत आहेत. यांतर्गत दर रविवारी ग्रुपचे सदस्य गावात स्वच्छता अभियान राबवित आहेत. मात्र दुसऱ्या दिवशी गावात पॉलीथीन दिसत असून त्यात खर्रा पन्नींचे प्रमाण सर्वाधिक प्रमाणात आढळत आहे.खर्रा पन्नीचा काहीच वापर होत नसून त्यापासून खतही तयार होत नाही. शिवाय यामुळे प्रदूषण व वातावरणाला अपायकारक असल्यामुळे यावर तोडगा म्हणजे गावात पॉलीथीन बंद करणे हाच उपाय आहे. करिता ग्रुपने गावच्या सरपंच कल्पना फुंडे यांना निवेदन देऊन गाव पॉलीथीन मुक्त करण्याची मागणी केली. या अर्जाची प्रतिलिपी पंचायत समिती सभापती व खंडविकास अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.गु्रपचे सुगमकर्ता भुषण लोहारे यांनी, ओल्या कचऱ्याचे आपण कंपोस्ट खत तयार करु शकतो व तसा उपक्रम शाळेत राबविला जातो. पण झिल्लीचा काहीच फायदा नसून त्याचा वापर कमी अथवा बंद व्हावा यासाठी अधिकारी तथा जनप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या चिमुकल्यांच्या प्रयत्नात सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या या कार्याला आता उपसरपंच सुरेश राऊत, मोरेश्वर फुंडे आणि गावकरी जुळत असून त्यांच्या कार्याला प्रेरित करीत आहेत.