नागरिकांची मागणी : अमर शहीद राणी अवंतीबाई न.प. शाळातिरोडा : नगर परिषदेद्वारे स्थापन करण्यात आलेल्या लोधीनगर (तिरोडा) येथील अमर शहीद राणी अवंतीबाई न.प. शाळेला संरक्षण भिंत व दोन वर्गखोल्या तयार करण्याची मागणी नागरिकांनी नगर प्रशासनाकडे केली आहे.नगर परिषदेची स्थापना सन १९५६ ला झाली. तेव्हापासून तत्कालीन वॉर्ड डॉ. राजेंद्रप्रसाद लोधीनगरमध्ये नगर परिषदेद्वारे डॉ. राजेंद्रप्रसाद न.प. प्राथमिक शाळा सन १९७० पर्यंत वर्ग पहिली ते चौथीपर्यंत सुरू होती. यानंतर या शाळेतील वर्ग तिसरी व चौथी हळूहळू बंद ककरण्यात आले व याच नावाची शाळा जुनीवस्ती तिरोडा येथे सुरू करून लोधीनगर गावात फक्त पहिली व दुसरी वर्ग ठेवण्यात आले. ही शाळा भाड्याच्या घरात सुरू होती.सन १९५६ पासून स्थापित शाळेची स्वत:ची इमारत न बनविता सन १९७० पासून सुरू झालेल्या शाळेची पक्की इमारत न.प. द्वारे बनविण्यात आली होती. सन १९८५ मध्ये निवडून आलेले तत्कालीन न.प. सदस्य राधेशाम नागपुरे यांनी शाळेची पूर्ण माहिती गोळा केली. तेव्हा त्यांना माहिती मिळाली की डॉ. राजेंद्र प्रसाद न.प. शाळेच्या नावाने जुनीवस्ती इथे इमारतीसाठी न.प.ला युडी-६ अंतर्गत कर्ज मिळाले असून आता याच नावाने इतर ठिकाणी इमारत बनविण्यासाठी कर्ज दिले जाणार नाही.यानंतर सन १९८७ ला लोधीनगर येथे नवीन शाळा अमर शहीद रानी अवंतीबाई न.प. प्राथमिक शाळा स्थापन करुन उपसंचालक नगर पालिका प्रशासनाकडून मंजुरी प्राप्त करण्यात आली. ही शाळा आजपावेतो वर्ग एक ते चारपर्यंत सुरू आहे. या शाळेची नवीन इमारत बनविण्यासाठी न.प. ने ०.५० डिसमिल जागा सन २००६ मध्ये घेतली व सन २००७ मध्ये शाळेत दोन खोल्या व एक कार्यालय सर्वशिक्षा अभियानांतर्गत बनविण्यात आले. तिरोडा शहरातील नाला जुनीवस्तीपासूनच्या शेतामधून वाहात असून शाळेजवळ असलेल्या नाल्यामधून वाहून गावाला व शाळेला लागूृन असलेल्या मोठ्या नाल्यास मिळतो. पावसाळ्यात पाणी नालीतून वाहतो आणि नाली कच्ची असल्यामुळे शाळेतील मुलांना या पाण्यापासून नेहमी धोका पत्करावा लागतो. शाळेला संरक्षणभिंत नसल्यामुळे मोकाट जनावरेही शाळेच्या आवारात येतात. याचाही धोका असतो. यासाठी संरक्षण भिंत व पक्की नाली बनवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)दोन वर्गांसाठी दोन खोल्यांची गरजया शाळेत वर्ग १ ते ४ या वर्गाचे विद्यार्थी शिकतात. पण शाळेत दोन खोल्या असल्याने एका खोली वर्ग पहिली व दुसऱ्या खोलीत वर्ग दोनचे विद्यार्थी बसून अध्ययन करतात. हे विद्यार्थी कसे शिकत असतील व शिक्षकही कसे शिकवत असतील, याची प्रचिती या प्रकारावरून येते. शिक्षणाचा खालचा पायाच कमजोर असेल तर वर मजबुती कशी राहणार. चार वर्गांसाठी चार खोल्यांची अत्यंत गरज असतानाही प्रशासन या समस्येकडे का बरे लक्ष देत नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी संरक्षण भिंतीचीही आवश्यकता आहे. यासाठी माजी नगरसेवक राधेशाम नागपुरे यांनी शाळेत संरक्षण भिंत व दोन खोल्या शाळेत बनविण्याची नगर परिषद प्रशासनास मागणी केली आहे.
संरक्षण भिंत व वर्गखोल्या बनवा
By admin | Updated: December 17, 2015 01:52 IST