शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

सिंचनाच्या सुविधा निर्माण करा

By admin | Updated: March 7, 2016 01:36 IST

गोंदिया हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रम नियोजनबध्द पध्दतीने राबविल्यास ...

अनुप कुमार यांचे निर्देश: मामा तलाव पुनरु ज्जीवन करण्यावर दिला भरगोंदिया : गोंदिया हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रम नियोजनबध्द पध्दतीने राबविल्यास संरक्षित सिंचनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यातून शेतकऱ्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ४ मार्च रोजी आयोजित जिल्ह्यातील मामा तलावांचे पुनरूज्जीवन या विषयावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, लघु पाटबंधारे विभाग जि.प.चे कार्यकारी अभियंता पठोडे, उपविभागीय अधिकारी गोंदिया के.एन.के.राव, तिरोडा उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे उपस्थीत होते.अनुप कुमार पुढे म्हणाले, सिंचनाच्या सुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे मिळाल्यास उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल. विविध यत्रंणा व अदानीच्या माध्यमातून माजी मालगुजारी तलावांच्या खोलीकरणाचा कार्यक्रम राबवावा, त्यामुळे तलाव पाणीसाठा उपलब्ध होणार असल्यामुळे मत्स्य विकासाचा कार्यक्रम राबवून मत्स्य सहकारी संस्थांना चांगल्याप्रकारे मत्स्य उत्पादन घेता येणार असल्याचे आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले. जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागातील नागरिकांनी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ऐन व अर्जून वृक्षावर टसर रेशामाचे उत्पादन घ्यावे. उत्पादन प्रक्रीयेत ग्रामस्थांना वनविभागाने सहभागी करून घ्यावे, त्यामुळे त्या गावातील लोकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. परिणामी त्यांची आर्थिक परिस्थीती सुधारण्यास मदत होईल. वनालगतच्या गावात टसर रेशमाचे उत्पादन घेण्यासाठी वनविभागाने पुढाकार घ्यावा. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी लाख उत्पादन घेऊन लाखचे युनिट जिल्ह्यात सुरु करावे. जिल्ह्यात विविध क्षेत्रात उत्पादनास वाव असून पाणी, जंगल आणि जमीन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जिल्ह्याची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी यामध्ये ग्रामस्थांना यंत्रणेने सहभागी करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यास सद्यस्थितीतसुध्दा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ धानाचे पीक न घेता भाजीपाला व फळवर्गीय पिंकाची लागवड करावी त्यामुळे आर्थिक स्थिती निश्चितच सुधारण्यास मदत होईल. जिल्ह्यात वनव्याप्त भाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वनावर आधारीत रोजगार ग्रामीणांना मिळावा यासाठी जिल्हयातील २५ गावात मध संकलनाचे काम सुरु करणार असल्याचे सांगत या गावातील लोकांना प्रशिक्षण देणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले. गावडे म्हणाले, जिल्हा परिषदेचे त्यांच्या अधिनस्त असलेल्या माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाचा नियोजनबध्द कार्यक्रम तयार केला आहे. येत्या तीन वर्षात जिल्हयाला २०० कोटी रुपये मिळाले तर मोठी सिंचन क्षमता जिल्ह्यात निर्माण होईल. डॉ. रामगावकर म्हणाले की, जिल्हयात कोहमारा व मजीतपूर येथे बांबू कारागिरांसाठी साहित्य निर्मितीचे केंद्र सुरु केले आहे. जिल्ह्यातील बांबू कारागीरांना व काष्ठशिल्पकारांना स्वावलंबी बनविण्यासाठी हे केंद्र उपयुक्त आहे. जिल्ह्यात १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे १७४८ तलाव आहे. याची सिंचन क्षमता ३५,४५८ हेक्टर इतकी आहे. ३८ तलाव हे १०० हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमतेचे असून त्याची सिंचन क्षमता ६५१० हेक्टर इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात १०० हेक्टर सिंचनक्षमतेच्या १४२१ तलावातून २८,७३१ हेक्टर सिंचन क्षमता असून प्रत्यक्षात त्याची सिंचन क्षमता १६,८२९ इतकी आहे. १०० हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमतेच्या ३८ तलावातून प्रत्यक्षात ५,८९० हेक्टर सिंचन करण्यात येते. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांची सिंचन क्षमता पुन:स्थापित करण्याकरिता ५६८ तलावांची राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत दुरूस्ती करण्यात आली आहे. ५,७०८ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. विदर्भ सघन सिंचन योजना कार्यक्रमांतर्गत ७६ मामा तलावांची दुरूस्ती करण्यात आली आही. यातून ८३० हेक्टर सिंचन क्षमता, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १११ मामा तलावांची दुरूस्ती करण्यात आली आहे. ८९५ हेक्टर सिंचन क्षमता तर इतर योजनांमधून २५ मामा तलावांची दुरूस्ती करण्यात आली आहे. यामधून १७६ हेक्टर सिंचन क्षमता पुनरस्थापित झाली आहे. सन २०१६-१७ या वर्षात जिल्हयातील सातही तालुक्यातील माजी मालगुजारी तलावांचा पुनरुज्जीवन कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यामधून ४१७ तलावांची पुनरूज्जीवन करण्यात येणार आहे. ३,८४३ हेक्टर सिंचन पुनरस्थापित होणार आहे. विमोचक सांडवा, पाळ, कालवा, येवा, गाळ काढणे, मत्स्यतळी तयार करणे या कामास २९ कोटी १३ लाख रु पये खर्च पहिल्या वर्षी अपेक्षीत आहे. सन २०१७-१८ या वर्षात ३७९ मामा तलावांच्या पुनरूज्जीवन कार्यक्र मातून २२६० हेक्टर सिंचन क्षमता होणार आहे. यासाठी २५ कोटी ३९ लाख रूपये निधी अपेक्षीत आहे. सन २०१८-१९ या वर्षात ३३६ मामा तलावांचे पुनरूज्जीवन करण्यात येणार आहे. यामधून १८२० हेक्टर सिंचन क्षमता पुन:स्थापित होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)