शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाचे ध्येय निश्चित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:17 IST

कुणबी समाजातील युवकांनी शिवरायांचे मावळे होवून जीवनाचे ध्येय निश्चित करून कार्य करतांना युध्दात जात आहे असे नाही, युध्द जिंकण्यासाठी जात आहे असे ठरवून कार्य करावे. तसेच विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेकडे मार्गक्रम करावे असे प्रतिपादन तज्ञ मार्गदर्शक प्रा.दिपक बहेकार यांनी केले.

ठळक मुद्देदिपक बहेकार : गुणवंत विद्यार्थी सत्कार व प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : कुणबी समाजातील युवकांनी शिवरायांचे मावळे होवून जीवनाचे ध्येय निश्चित करून कार्य करतांना युध्दात जात आहे असे नाही, युध्द जिंकण्यासाठी जात आहे असे ठरवून कार्य करावे. तसेच विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेकडे मार्गक्रम करावे असे प्रतिपादन तज्ञ मार्गदर्शक प्रा.दिपक बहेकार यांनी केले.कुणबी समाज सांस्कृतिक प्रबंधन समितीच्यावतीने संत तुकाराम महाराज कुणबी समाज भवनात रविवारी (दि.२०) आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कुणबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय शिवणकर होते. तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रबोधनकार मुख्याध्यापिका सुनिता ब्राम्हणकर, सभापती सुनंदा बहेकार, श्रावण कटरे तर पाहुणे म्हणून जि.प.सदस्य सुखराम फुंडे, अ‍ॅड. सेवकराम बागडे, प्रबंधन सेवा समितीचे प्रा.सी.जी.पाऊलझगडे, से.शिक्षक काशिराम शिवणकर, प्रितम गायधने, जि.प.माजी अध्यक्ष उषा मेंढे, ओमप्रकाश मटाले, संगीता दोनोडे, लक्ष्मण चुटे, पं.स.सदस्य सिंधू भुते, लिलाधर बहेकार, दिगंबर करोे, कृष्णा कोरे, सांस्कृतिक समितीचे सचिव शरद फुंडे, विवाह समितीचे शालीक येटरे, महिला समिती अध्यक्ष लिला कठाणे, सचिव योगीता कठाणे उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत सामाजिक क्रांतीचे प्रणेतेचे पुस्तक भेट देवून करण्यात आले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्याचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. समाजातील पालकांनी पाल्यांच्या शिक्षणाचे नियोजन करावे जेणेकरुन भविष्यात मनस्ताप होणार नाही असे सुनंदा बहेकार यांनी सांगीतले. याप्रसंगी बहुउद्देशिय हायस्कूल अर्जुनी-मोरगावच्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या भूमिका साकारुन प्रबोधन केले. या चमूचा अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित सुनिता ब्राम्हणकर यांच्या महिला समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रस्तावीक प्राचार्य सी.जी.पाऊलझगडे यांनी मांडले. संचालन रविंद्र येटरे यांनी केले. आभार प्रदर्शन सुरेंद्र मेंढे यांनी मानले.कार्यक्रमासाठी राजीव फुंडे, अमित हेमणे, मुकेश मेंढे, जगदिश चुटे, दिपक मेंढे, राजु चुटे, देवराज बहेकार, दिनाजी चुटे, संजय बहेकार, योगेश शिवणकर, बाबूलाल दोनोडे, तुळसीराम मेंढे, बळीराम चुटे, दिलीप मेंढे, गोपालकृष्ण ब्राम्हणकर, गजानन भुते, केवलचंद शेंडे, एस.के.पाथोडे, प्रशांत गायधने, मोहीनी निंबार्ते, तिरथ येटरे, प्रदुमन मारवाडे, अ‍ॅड. पाथोडे, इंजि. अनिल पाऊलझगडे, रोशन बोहरे, धनलाल मेंढे व कुणबी समाज सेवा समिती, सांस्कृतिक प्रबंधन समिती व्यापार समिती, महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.