शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन करा, अपघात टाळा

By admin | Updated: January 13, 2017 01:04 IST

जिल्ह्यात मागील वर्षी रस्ता अपघातात जेवढे मृत्यू झाले ते प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी करावयाचे आहे.

अभिमन्यू काळे : २८ वा रस्ता सुरक्षा अभियानाचे थाटात उद्घाटन गोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी रस्ता अपघातात जेवढे मृत्यू झाले ते प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी करावयाचे आहे. रस्ता अपघातास कारणीभुत घटकांचा शोध घ्यावा लागणार आहे. अपघात टाळण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यांचे पालन होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासूनच योग्य नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटक म्हणून काळे बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता भिसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण उपस्थित होते. हे अभियान दरवर्षी राबविण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, यावर्षी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्र मात पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, तसेच इतर यंत्रणासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा राहणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधून जिल्हा हागणदारीमुक्त करावयाचा आहे. जिल्ह्यातील माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील उपक्र म राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. पुलकुंडवार म्हणाले, केवळ अभियानाचे आयोजन करून सुरक्षीतता मिळणार नाही. रस्त्यावर प्रत्येक जण सुरक्षीत कसा राहील, हे महत्वाचे आहे. अपघात होण्याचे कारण शोधून ते टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. चालक हा चांगला प्रशिक्षित असला पाहिजे. चालकाची मानिसकता तपासणे देखील महत्वाचे आहे. वाहतूक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने धावून गेले पाहिजे. १०८ क्र मांकाच्या रु ग्णवाहिका सेवेची माहिती प्रत्येकाला झाली तर अशाप्रसंगी अपघातग्रस्तांना वेळीच वैद्यकीय सुविधा पुरविता येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सोनाली चव्हाण व डॉ.संगीता भिसे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी राज्यातील अपघाताची स्थिती व रस्ता सुरक्षा अभियानाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला शहरातील अनेक शाळांतील विद्यार्थी, ड्रायव्हींग स्कूलचे संचालक, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सहायक मोटर वाहन निरीक्षक संदीप पवार, प्रभाकर पेन्सीलवार, अनिरूध्द देवधर, कर्मचारी प्रशांत मांडवेकर, राहुल कुरतोडवार, राठोड, गुल्हाणे, विग्रे, मोहोड, वानखेडे, करु णा बसवनाथे, सविता राजुरकर यांनी सहकार्य केले. संचालन सुजाता बहेकार यांनी केले. आभार संदीप पवार यांनी मानले. (प्रतिनिधी)