शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेवर ‘महिलाराज’

By admin | Updated: January 20, 2015 00:06 IST

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ५३ सदस्यांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यात ५० टक्के आरक्षणानुसार २७ मतदार

५० टक्के महिला : दिग्गजांना धक्का, अनेकांचे मतदारसंघ आरक्षित गोंदिया : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ५३ सदस्यांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यात ५० टक्के आरक्षणानुसार २७ मतदार संघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत महिला सदस्य राहणार असल्यामुळे जिल्हा परिषदेवर ‘महिलाराज’ येणार आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुका अवघ्या ६ महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या ११ जुलैला विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामी लागली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ५३ मतदार संघांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. प्रत्येक सोडतीसाठी एका बरणीत संबंधित जि.प.मतदार संघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातील एक चिठ्ठी बालकाच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के.लोणकर यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी व जिल्हाभरातून आलेले इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने हजर होते.यापूर्वी जिल्हा परिषदेत महिलांची संख्या ३३ टक्के होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेवर ५० टक्के महिला आरक्षण लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच २७ महिला सदस्य दिसणार आहेत. या आरक्षणामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांसह अनेक दिग्गज उमेदवारांना आपला मतदार संघ सोडून जवळच्या दुसऱ्या मतदार संघात आसरा घ्यावा लागणार आहे. तर काही जणांना स्वत: बाजुला राहून आपल्या सौभाग्यवतीला सामोरे करावे लागणार आहे. दिग्गजांसह ३९ सदस्यांच्या मतदार संघांवर गंडांतरसोमवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत विद्यमान ५२ सदस्यांपैकी ३९ सदस्यांना नवीन आरक्षणानुसार यावेळी पुन्हा आपल्या मतदार संघातून निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळे त्यांना जवळच्या दुसऱ्या मतदार संघात आश्रय घ्यावा लागणार आहे. ज्यांच्या मतदार संघांवर गंडांतर आले त्या दिग्गजांमध्ये विद्यमान जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, उपाध्यक्ष मदन पटले, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, विद्यमान सभापती मोरेश्वर कटरे, सविता पुराम, प्रकाश गहाणे, कुसन घासले, याशिवाय नरेंद्र तुरकर, श्रावण राणा, पंचम बिसेन, विष्णू बिंझाडे, किरण गावराने, रुपाली टेंभुर्णे, मिलन राऊत, राजेश चांदेवार, संदीप भाटीया, अरविंद शिवणकर, उमाकांत ढेंगे, किरण कांबळे आदींचा समावेश आहे. त्यांना इतर कुठल्या मतदार संघातून निवडणूक लढवावी लागेल.