शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात नऊपैकी सात ग्रामपंचायतवर महिलाराज

By admin | Updated: August 7, 2015 01:39 IST

तालुक्यात एकूण नऊ ग्रामपंचायतीमध्ये ४ आॅगस्ट रोजी सरपंच-उपसरपंच पदांची निवडणूक झाली.

एका ठिकाणी राकाँ : पाच काँग्रेस तर तीनमध्ये भाजपविजय मानकर  सालेकसातालुक्यात एकूण नऊ ग्रामपंचायतीमध्ये ४ आॅगस्ट रोजी सरपंच-उपसरपंच पदांची निवडणूक झाली. यात सात ठिकाणी महिलांनी सरपंचपद काबिज केले. विशेष म्हणजे नऊपैकी केवळ चार ठिकाणी महिलांसाठी सरपंचपद आरक्षित होते. परंतु इतर तीन ठिकाणीसुद्धा महिलांनी पुरूषांना मागे ठेवून ग्रामपंचायतींवर कब्जा केला आहे.पुरूषांनी सर्व हतकंडे आजमावूनही त्यांना दारून पराभव पत्कारावा लागला. या सर्व प्रकारामुळे महिलांमध्ये निर्णय क्षमता वाढली असून त्या आता पुरूषांवर अवलंबून राहणे पसंत करीत नसल्याचेच दिसून येते.तालुक्यातील एकूण ४१ ग्रामपंचायतींपैकी यावर्षी नऊ ग्रामपंचायतींमध्ये कार्यकाळ संपल्यावर सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेस, भाजप, राकॉ व शिवसेना समर्थकांनी आपापल्या सोयीनुसार पॅनल तयार करून निवडणूक लढविली. यात सदस्य निवडूण येण्यात सर्वच मुख्य पक्षांना समिश्र प्रतिसाद मिळाला. परंतु सरपंच निवडणुकीत नऊपैकी काँग्रेसने पाच, भाजपचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका ग्रामपंचायतवर आपला सरपंच बनविण्यात यश आले.कोटजमुरा येथे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. येथे बबीता विजय मेश्राम काँग्रेसकडून अर्ज केला. त्यांनी छाया बोरकर यांचा पराभव करीत सरपंच पद मिळविले. मुंडीपार येथे किरण महेश वाघमारे सरपंच बनल्या. पाऊलदौना ग्रामपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने तेथे भाजपचे अरूणकुमार श्यामप्रकास टेंभरे सरपंच तर दिनेश दमाहे उपसरपंच बनले. मानागड येथे काँग्रेसचे भोजराज इंदल सयाम सरपंच तर सुरेखा सुरीतलाल मडावी उपसरपंच बनल्या. कोटरा ग्रामपंचायतवर काँग्रेसच्या मीरा ओमप्रकाश नाईक सरपंच तर संतोष तुळशीराम चुटे उपसरपंच बनले. सातगाव येथील ग्रामपंचायतवर भाजपला बहुमत असले तरी येथे सरपंच पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असून येथे काँग्रेसच्या संगीता संजय कुसराम या एकमेव उमेदवार अविरोध सरपंच बनल्या. तर भाजपचे पृथ्वीराज शिवणकर उपसरपंच बनले. २५ जुलै रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल २६ जुलै रोजी लागल्यापासून सरपंच-उपसरपंच कोण बनणार? याबाबत चर्चा सुरू होती. निवडून आलेल्या सदस्यांना खरेदी करणे, त्यांना सहलीवर नेणे इत्यादी प्रकरण घडत राहिले.परंतु या वेळी जवळपास सर्व ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या सद्विवेकाने सरपंच निवडणुकीत भाग घेताना दिसले.पद आरक्षित नसतानाही महिल्या झाल्या सरपंचकावराबांध ग्रामपंचायतवर भाजपच्या मंजूलता पोषण बनोठे यांनी काँग्रेसचे गजानन मोहारे यांचे सरपंच बनण्याचे स्वप्न भंग करीत त्यांचा पराभव करून सरपंच बनल्या. पोवारीटोला ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा किशोर नागपुरे यांनी काँग्रेसचे चंद्रशेखर दमाहे यांचा पराभव करीत सरपंचपद काबिज केले. या दोन्ही ठिकाणी महिला आरक्षण नसूनसुद्धा महिलांना सरपंच बनण्यात यश आले.