शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

महावीर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमली नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 9:04 PM

श्रमण भगवान महावीर स्वामी यांची २६१७ वी जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देश्रमण भगवान महावीर स्वामी यांची २६१७ वी जयंती

ऑनलाईन लोकमतदेवरी : श्रमण भगवान महावीर स्वामी यांची २६१७ वी जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. नॅशनल हायवेवरील जैन मंदिरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मिरवणुकीतील महावीर भगवंताच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले.भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्म कल्याणक महोत्सवांतर्गत गुरुवारी सकाळी जैन मंदिरात पूजा अर्चना व आरती करण्यात आली. शांतीधाराची बोली नरेशकुमार अजमेरा तर ध्वजारोहणची बोली नरेंद्र पांड्याद्वारे बोलण्यात आली. पूजा व अभिषेकानंतर १० वाजता महावीर स्वामींच्या शोभायात्रेला मंदिरापासून सुरुवात झाली. सजविलेल्या वाहनात भगवान महावीर स्वामींची प्रतिमा ठेवून अत्यंत शिस्तबद्ध निघालेल्या या शोभायात्रेत भगवंतांचा जयजयकार करीत महिला पुरुषांनी भक्तीगीत सादर केले.पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले पुरुष आणि लाल साड्या परिधान केलेल्या शेकडो महिला या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. समाजबांधवांनी एकमेकांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत एकतेचे दर्शन घडविले. जैन मंदिरापासून निघालेली शोभायात्रा नॅशनल हायवे, दुर्गा चौक, कारगील चौक, गणेश चौक ते जैन मंदिर येथे समाप्त झाली. त्यानंतर मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त जैन मंदिराला आकर्षकरित्या सजविण्यात आले होते. संध्याकाळी आरती व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८