शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

महात्मा गांधी रोजगार हमीच्या कामात घोळ

By admin | Updated: October 17, 2015 02:30 IST

जवरी येथील बहुचर्चित रोजगार सेवक अशोक सिताराम गायधने याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या ...

जवरी येथील प्रकरण : होमगार्डच्या चौकशीची मागणीआमगाव : जवरी येथील बहुचर्चित रोजगार सेवक अशोक सिताराम गायधने याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. नाला सरळीकरण, मामा तलाव खोलीकरण, गेट चौकी तलाव या कामात मजुरांची बोगस नोंद, तसेच लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. जवरी येथील धनराज हरी हटवार हा आमगाव पोलीस ठाण्यात गृहरक्षक म्हणून त्या काळात काम करीत होता. सदर व्यक्ती हजेरी क्रमांक ३७०४ वर २७ ते ३० जून पर्यंत मजूर म्हणून त्यांची नोंद करण्यात आली. या धनराज हटवारला चारशे पन्नास रुपये रोजी दाखविण्यात आली. त्यांच्या सोबत असलेल्या पंचेविस ते तिस लोकांना १३५ रुपये मजूरी मिळाली. काम एक मग सर्व मजुरांना सारखी मजूरी मिळने आवश्यक होते. मात्र ते या ठिकाणी झाले नाही. धनराज हरी हटवार होमगार्ड आहे. तो २७ ते ३० जून या कालखंडात करंजी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या बंदोबस्ताकरिता कार्यरत होता. मात्र त्याच कालखंडातील त्याची हजेरीवर उपस्थिती दाखविण्यात आली. विशेष म्हणजे ३० जून रोजी सर्व मजुरांचे वेतन झाल्याचे दाखविण्यात आले. जवळपास २५० ते ३०० मजूर कामावर कार्यरत होते. त्या मजुरांकडून प्रत्येकी विस रुपये रोजगार सेवकांनी मजुरांकडून घेतले. शासनाकडून पैसे घेण्याचा कोणताच आदेश नसतानाही वसुली बेकायदेशिर असल्याचा आरोप जवरी ग्रामस्थांनी करुन चौकशीची मागणी केली आहे.हजेरी क्रमांक ३११५ च्या एम.बी. नंबर नाही. हजेरी पटावर विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, रोजगार सेवकाची याची स्वाक्षरी नाही. हजेरी पटावर दहा मजुरांचे खोटे नाव दाखविण्यात आले. गावकऱ्यांनी माहितीच्या अधिकारात जी माहिती मिळाली तेथे १० व्यक्तीचे नाव कमी करण्यात आले. त्या लोकांची १३५, १५५, १६५ या दराने रोजी काढण्यात आली. मात्र ते मजूर कामावर गेलेच नाहीत. यात मोहीनी अशोक गायधने, शकुंतला शामलाल मेंढे, वर्षा अशोक डोये (ही मुलगी शिक्षण घेत आहे), तसेच अमृत बकाराम गायधने, अमोल राधेशाम गायधने, राधेशाम बकाराम गायधने, आशा विजय दिवाडे, रंजना अजय दिवाडे एवढ्या मजुरांचे काम करण्यात आले. हे सत्य माहितीच्या अधिकारामार्फत समोर आले. मामा तलावावर मोहीनी अशोक गायधने, अमृत बकाराम गायधने, सरस्वता रमनलाल हत्तीमारे, आशा विजय दिवाळे, वर्षा अशोक डोये हे मजूर कधी गेले कधी गेले नाही. विशेष म्हणजे मामा तलाव कामावर वरील मजूर कार्यरत होते. चौकी तलावाच्या कामावर ईश्वरदास धानू गायधने, दुलीचंद नत्थू पाथोडे, अमोल राधेशाम गायधने, ज्योती प्रमोद तिरपुडे, मनिराम गणपत फुंडे हे मजूर कामावर गेले नाही. मात्र मजुरांची मजुरी उचलण्यात आली. या गावात सन २००८-०९ पासून मामातलाव खोलीकरण, नाला सरळीकरण, चौकीतलाव या कामावर जवळपास तिनशे मजूर कार्यरत होते. सदर तिन्ही कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजना व जिल्हा परिषद गोंदियाअंतर्गत करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)