शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; विधानसभेच्या निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

दोन दिवसापूर्वी गोंदिया जिल्हा पोलिसांनी घातपात करण्यासाठी देवरीच्या डोंगरगाव येथील एका इसमाच्या घरून २१ डिटोनेटर पोलिसांनी जप्त करीत आरोपीला अटक केले. दुसऱ्या दिवशी सालेकसा तालुक्याच्या मगरडोह येथे नक्षलवाद्यांनी एका इसमाची हत्या केल्यामुळे पोलीस बंदोबस्त चोख नेमण्यात आला.

ठळक मुद्देनक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात कुमक : निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शांततेत पार पडावी,यासाठी गोंदिया जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया तोंडावर असतांना नक्षलवाद्यांनी सालेकसा तालुक्यातील मगरडोह येथे एका इसमाची हत्या केल्यामुळे आणखीनच बंदोबस्तात भर टाकावी लागली. गोंदिया जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंपन्या मागविण्यात आल्या आहेत.गोंदिया जिल्ह्याच्या चारही विधानसभा क्षेत्रात चोख बंदोबस्त नेमण्यात आला.गोंदिया जिल्ह्यात एक पोलीस अधीक्षक, एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सहा उपविभागीय पोलीस अधिकारी,२१ पोलीस निरीक्षक, १५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, २००९ पोलीस कर्मचारी, ६५६ गृहरक्षक दलाचे जवान, १३ बीएसएफ कंपन्या, ३ बीडीडीएस कंपन्या, विशेष अभियान पथकाच्या १५ पार्ट्या, क्युआरटीची १ पार्टी व नक्षलग्रस्त भागात घातपाताच्या घटना घडू नयेत यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी गोंदिया जिल्हा पोलिसांनी घातपात करण्यासाठी देवरीच्या डोंगरगाव येथील एका इसमाच्या घरून २१ डिटोनेटर पोलिसांनी जप्त करीत आरोपीला अटक केले. दुसऱ्या दिवशी सालेकसा तालुक्याच्या मगरडोह येथे नक्षलवाद्यांनी एका इसमाची हत्या केल्यामुळे पोलीस बंदोबस्त चोख नेमण्यात आला. निवडणुकीच्या काळात प्रत्येक कर्मचाऱ्याची करडी नजर राहणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील जनतेने निर्भयतेने मतदान करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्यासाठी शांततेत स्वयंस्फूर्तीने मतदान करावे असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे. नेमण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी आज (दि.१९) रोजी रवाना करण्यात आले. आजपासूनच जिल्हाभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नक्षलग्रस्त भागात ३ वाजेपर्यंत मतदानगोंदिया जिल्ह्यातील आमगाव व अर्जुनी-मोरगाव या दोन विधानसभा क्षेत्रात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता पर्यंत मतदान होणार आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी नक्षलग्रस्त भागातील जनतेनेही निर्भतेने मतदान करावे, मतदान पेट्या सुरक्षित स्थळी पोहचाव्यात यासाठी दुपारी ३ वाजतापर्यंतच मतदानाची वेळ ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाnaxaliteनक्षलवादी