शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महामंडळाची बियाणे १२ रूपयांनी महाग

By admin | Updated: June 4, 2017 00:52 IST

महामंडळाकडून महाबीजचे देण्यात येणारे १००१ या धानाचे वाण ३२ रूपये किलो दराने विक्री केले जात आहे.

खासगी कंपन्यांकडून २० रूपये किलो : महागड्या बियाण्यांनी शेतकऱ्यांची पंचाईत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महामंडळाकडून महाबीजचे देण्यात येणारे १००१ या धानाचे वाण ३२ रूपये किलो दराने विक्री केले जात आहे. तर हेच धान खासगी कंपन्यांकडून २० रूपये किलो दराने विक्री केले जात आहे. शासनाचे महामंडळ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी की लुबाडण्यासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकच धान खासगी कंपन्याकडून १२ रूपये कमी किंमतीत मिळत असल्याने महाबीजचे महागडे बियाणे कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.गोंदिया जिल्ह्यासाठी विविध जातीचे १३ हजार ७७८ क्विंटल धान विक्रीसाठी आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यात पीकेव्ही एचएमटीचे एक हजार ६३५ क्विंटल, स्वर्णा ७५० क्विंटल, पीकेव्ही किसान १५५ क्विंटल, आयआर-६४ चे ३४८ क्विंटल, एमटीयू १०१० चे आठ हजार ७७ क्विंटल, एमटीयू १००१ चे एक हजार १४ क्विंटल, जेजीएल-१७९८ चे ६०० क्विंटल, श्रीराम ८३५ क्विंटल, डिआरके-२ चे १८५, सह्यांद्री १५ क्विंटल, सह्यांद्री ३ चे १० क्विंटल, सह्यांद्री ४ चे ५ क्विंटल, कर्जत-३चे ९० क्विंटल, आरटीएन-५चे ५९ क्विंटल असे एकूण १३ हजार ७७८ क्विंटल बियाणांचा जिल्ह्याला पुरवठा करण्यात आला. या बियाण्यांमध्ये १००१ हे बियाणे ३२ रूपये किलो दराने महामंडळाकडून विक्री केले जात आहे. खासगी कंपन्यांकडून कमी दरात विक्री होणारे वाण असताना महामंडळाचे महागडे वाण कोण घेईल असे शेतकऱ्यांना वाटत आहे.५० टक्के अनुदानासाठी ७१४ क्विंटल बियाणेखरीप हंगामासाठी ५० टक्के अनुदानावर एमटीयू १०१० हे धानाचे वाण जिल्हा निधी योजनेतून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील शेतकऱ्यांना ७१४ क्विंटल धानाची बियाणे ५० टक्के अनुदानावर दिले जाणार आहेत. यात गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १२० क्विंटल, आमगाव ८० क्विंटल, तिरोडा १०० क्विंटल, गोरेगाव ८४ क्विंटल, सडक-अर्जुनी ९० क्विंटल, अर्जुनी-मोरगाव ९० क्विंटल, सालेकसा व देवरी प्रत्येकी ७५ क्विंटल बियाणे अनुदानावर द्यायचे आहेत. २८०० रूपये किंमतीचे असलेले धान्य ५० टक्के अनुदानावर म्हणजे १४०० रूपयात देण्यात येत आहेत. एमटीयू १०१० या धानाचे बियाणे २५ किलो पंचायत समितीमधून ३५० रूपये किमतीला मिळत आहे. परंतु हेच धान कृषी केंद्रांमधून ७०० रूपये किंमतीला विक्री करण्यास भाग पडत असल्याने शेतकऱ्यांच्या या अनुदानामुळे कृषी केंद्र चालक संतापले आहेत. त्यामुळे ही बियाणे परत करण्याचा नाद कृषी केंद्र चालकांचा आहे. १९ लाख ९९ हजार २०० रूपयांची बियाणे अनुदानावर या जिल्ह्यात दिली जाणार आहेत.