शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महागाव महसूल मंडळात धानपिकांना जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 21:52 IST

तालुक्यात १३ व १४ आॅक्टोबर रोजी महागाव महसूल मंडळात अचानक झालेला चक्रीवादळ व पावसाच्या तडाख्यामुळे हजारो हेक्टर मधील धान पीकाला फटका बसला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : चक्रीवादळ व पावसाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यात १३ व १४ आॅक्टोबर रोजी महागाव महसूल मंडळात अचानक झालेला चक्रीवादळ व पावसाच्या तडाख्यामुळे हजारो हेक्टर मधील धान पीकाला फटका बसला आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्यापही सर्वेक्षण करण्यात आले नाही. खासदार नाना पटोले यांनी बाधित क्षेत्राच्या जानवा गावाला मंगळवारी भेट देवून शेतकºयांना संयम राखण्याचे आवाहन केले.आसमानी व सुलतानी संकटामुळे बळीराजा सदैव त्रस्त असतो. दुष्काळाच्या दुष्टचक्राचे वलय सदैव त्याचा पाठलाग करीत असते. अवसायनात जीवन कंठीत असताना कर्जबाजारीपणा दूर होत नाही. तोच पुन्हा एकदा महागाव महसूल मंडळातील शेतकºयांवर एकाएकीच आभाळ कोसळले. १३ व १४ तारखेला आलेल्या वादळी पावसाने बळीराजाच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावला. शेतात झोपलेले धानपिक बघून त्यांचे डोळे पाणावले. शेतकºयांनी याची माहिती देताच खासदार पटोले यांनी मंगळवारी जानवा गावाला रात्री भेट देवून शेतातील धान पिकाची पाहणी केली. लगेच त्यांनी जिल्हाधिकाºयांशी शेतकºयांच्या व्यथा संदर्भात चर्चा केली. या नैसर्गिक संकटामुळे ७० टक्के धानपिकाचे नुकसान झाले आहे. या धानपीकाला तुडतुडा या किटकाचा प्रादुर्भाव आहे. पण निद्रावस्थेत असलेल्या धानपिकावर किटकनाशक फवारणी करणे सुद्धा शेतकºयांना शक्य नाही. हताश होऊन शेवटी तशाच अवस्थेत त्यांनी हे धानपिक सोडून दिले. यापूर्वी याच परिसरात २८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसानेही धानपिकाची नासाडी केली होती. परिपक्वतेच्या वाटेवर असलेले हे धानपिक कापणी सुद्धा करु शकत नाही, अशी विदारक अवस्था परिसरातील शेतकºयांची आहे.यावेळी पटोले यांनी शेतकºयांना धीर दिला. ते म्हणाले पीक विम्याची योजना चुकीची आहे. पीक विमा काढलेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई मिळायला हवी. हवामानाच्या आधारावर विमा मिळायला पाहिजे अशी मागणी आपण केंद्र शासनाकडे केली आहे. कर्जमाफीचे शासनाचे धोरण चुकीचे आहे. कर्ज भरणा केला त्यांना व ज्यांनी केला नाही अशानांही कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा. आॅनलाईन पद्धत व सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.अनेकांचे अर्ज करुन देखील ते अपलोड झाले नाहीत. त्यामुळे सर्व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी. ओरिसा राज्यात धानाला २९९० रुपये प्रतिक्विंटल भाव तर महाराष्टÑात १५५० रुपये एवढा आहे. ही विषयमता का? असा प्रश्न निर्माण करुन शेतकºयांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये बोनस देण्याची मागणी त्यांनी केली. शेतकºयांना धैर्य देताना एकोप्याने संकटाला सामोरे जा. प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले.