शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोची विहीर झाली गायब

By admin | Updated: October 14, 2016 02:11 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथे सरपंचपुत्राच्या शेतात बांधलेली सिंचन विहीर गायब झाली आहे.

सरपंचपुत्राचा प्रताप : आयुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई थंडबस्त्यातगोंदिया : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथे सरपंचपुत्राच्या शेतात बांधलेली सिंचन विहीर गायब झाली आहे. या विहिरीच्या बांधकामासाठी झालेला खर्च १ लाख २४ हजार ९५३ शासकीय यंत्रणेने अदाही केला. मात्र आता ज्या गटात ती विहीर खोदली होती तेथून ती विहीरच गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या रोजगार हमीच्या यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शासनाची दिशाभूल करून फसवणूक करण्याच्या या प्रकाराबद्दल संबंधित लाभार्थ्यासह सर्व यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी गावातील काही सूज्ञ लोकांनी केली आहे. मात्र अद्याप कोणावरही कोणतीही कारवाई झालेली नाही.प्राप्त माहितीनुसार, निमगाव येथील सरपंच देवाजी डोंगरे यांचे पूत्र राजेश यांनी म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत आपल्या शेतात (गट क्रमांक १४२ मध्ये ) सिंचन विहिर बांधण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार सरपंचपदाच्या प्रभावाने २१ एप्रिल २०११ च्या ग्रामसभेत त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सदर सिंचन विहीरीचे बांधकाम २०१४-१५ मध्ये पूर्ण झाल्याचे दाखवून पैशाचीही उचल करण्यात आली. दरम्यान गावातील काही जागरूक नागरिकांनी शंका आल्यानंतर पाहणी केली असता ज्या गट क्रमांकात विहिरी मंजुर होती तिथे विहिरीचे बांधकामच केले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे देवाजी महारू कोल्हे यांनी गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) यांच्या पत्रानुसार अर्जुनी मोरगावचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी चौकशी केली असता ज्या गटात (क्रमांक १४२) डोंगरे यांनी विहीर बांधल्याचे दर्शविले होते त्या घटात विहिरच नसल्याचे दिसून आले. वास्तविक जी सिंचन विहीर बांधली ती राजेश डोंगरे यांच्या नावे असलेल्या शेतात नसून त्यांच्या आई मनोरमा यांच्या नावाने असलेल्या गटात असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)