शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

हत्या-आत्महत्या प्रकरणामागे प्रेमाच्या त्रिकोणाचा संशय

By admin | Updated: October 21, 2016 01:41 IST

गोंदियाच्या अंबाटोली परिसरात शेजारी-शेजारीच राहणाऱ्या प्रेमी युगलाने देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून जीवनयात्रा संपविली.

आकाशच्या चिठ्ठीतून उघड : देशी कट्ट्याबाबत तपास सुरूचगोंदिया : गोंदियाच्या अंबाटोली परिसरात शेजारी-शेजारीच राहणाऱ्या प्रेमी युगलाने देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून जीवनयात्रा संपविली. आकाश आणि काजलच्या प्रेमात तिसरी कोणी व्यक्ती डोकावल्याचा आणि काजल आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा संशय आल्याने आकाशने हे कृत्य केल्याचे आतापर्यंतच्या तपासात आढळून आले.आकाश वैद्य आणि काजल मेश्राम यांचे मृतदेह बुधवारी सकाळी गोंदियापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या नवाटोला-घिवारी या गावादरम्यान असलेल्या कालव्याच्या काठावर आढळल्याने खळबळ उडाली होती. आकाशने मंगळवारच्या रात्री काजलच्या डोक्यात गोळी घालून नंतर स्वत:वर गोळी चालवून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांचे गेल्या दोन ते अडिच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून काजल पुण्यात गेल्यापासून तिच्यावर आकाशला संशय येऊ लागला. मूळच्या तुमसर (जि.भंडारा) येथील परंतू सध्या पुण्यात असलेल्या एका युवकाशी काजलची मैत्री आकाशला आवडली नाही. त्यामुळे ती आपल्याला सोडून त्याच्यावर प्रेम करीत असल्याचा त्याला संशय येऊ लागला व त्यातूनच हे कृत्य घडल्याचे तपासात पुढे आले.पोलिसांनी दोघांचेही मोबाईल जप्त केले असून त्यातील माहितीची उकल तज्ज्ञांकडून केली जात आहे. दरम्यान ज्या तरुणावरील संशयातून आकाशने हे कृत्य केले त्या तरुणालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले आहे. त्याने आपल्यात आणि काजलमध्ये केवळ निकोप मैत्रीचे संबंध होते, असे पोलिसांना फोनवरून सांगितले. पण प्रत्यक्ष भेटीत आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.या प्रकरणात वापरलेला देशी कट्टा आकाशकडे कुठून आला याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्याचे फिंगर प्रिंट घेऊन ते परीक्षणासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)