शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गेल्यावर्षीच्या विद्यार्थिनींच्या सायकलींना खो

By admin | Updated: July 26, 2016 01:36 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना दळण-वळणाच्या साधनाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये...

पदाधिकाऱ्यांची उदासीनता : महिला बालकल्याण विभागाचा असाही नाकर्तेपणागोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना दळण-वळणाच्या साधनाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी शासनाने मानव विकास कार्यक्रम व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत मुलींना सायकल देण्याची योजना सुरू केली. परंतु सत्र २०१५-१६ या शैक्षणिक सत्रातील एकाही लाभार्थी मुलीला जिल्हा परिषदेने सायकलचे वाटप केले नसल्याची माहिती पुढे आली आहे.शाळेतपासून दोन किमी किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर राहणाऱ्या इयत्ता आठवी व नववीच्या मुलींना सायकल वाटप करण्यात येते. दरवर्षी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील मुलीांना शाळेत जाण्यास सोय व्हावी म्हणून शासनाने सायकल देणे सुरू केले. गोंदिया जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी ५०० च्या घरातील विद्यार्थीनींना सायकल वाटप केले जाते. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाला २० ते २१ लाख रूपयाचा निधी दिला जातो. या विभागाने सन २०१५-१५ या वर्षात अनुसूचित जातीच्या १३१ विद्यार्थीनींना ४ लाख ८५ हजाराच्या सायकल वाटप केल्या होत्या. अनुसूचित जमातीच्या १०४ विद्यार्थीनींना ३ लाख ८७ हजार रूपयाच्या सायकली तर सर्वसाधारण प्रवर्गातील २६२ मुलींना ९ लाख ७० हजाराच्या सायकली वाटप केल्या.शासनाने २०१५-१६ या वर्षात ५०० च्या घरात असलेल्या लााभार्थ्यांसाठी २१ लाख रूपये शासनाने वर्षभरापासून या विभागाला दिले. परंतु या विभागाच्या उदासिनतेमुळे दुसरे वर्ष लागूनही मुलींना सायकल देण्यात आल्या नाही. आता सत्र २०१६-१७ सुरू झाले असताना जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडे अद्याप सत्र २०१५-१६ चे नियोजन आहे. या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील ५०० विद्यार्थीनी सायकलींपासून वंचीत आहे. (तालुका प्रतिनिधी)जि.प. सदस्यांना हवेत आपले ‘कॅन्डीडेट’जि.प. अंतर्गत देण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी पात्र उमेदवार सोडा, आधी माझ्या ‘कॅन्डीडेट’ चे नाव आले पाहिजे अशी भूमिका घेत अनेक जि.प.सदस्यांची चढाओढ सुरू असते. माझ्या मतदाराच्या कुटुंबियांना महिला व बाल कल्याण विभागातील योजनांचा लाभ मिळावा यासाठी अनेक जिल्हा परिषद सदस्यांच्या चकरा या विभागात होता. गरजू लाभार्थ्यांची यादी तालुक्यातील प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून येते. त्या यादीत नाव टाकण्यापासून तर जि.प.च्या कार्यालयात हे नाव यादीत यावे यासाठी प्रयत्न सुरू असते. सर्वसाछारण सभेनंतर मागच्या वर्षीच्या सायकल वाटण्याचा तोडगा निघणार आहे. सन २०१५-१६ या वर्षाचे नियोजन आता सुरू आहे. यासाठी निधी उपलब्ध आहे. या सायकल वाटप झाल्यानंतर सन २०१६-१७ चे नियोजन करण्यात येईल. -जे.एम. अंबादेउपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण, जि.प. गोंदिया