शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:33 IST

शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहे. अन्यथा त्यांचा घरभाडे भत्ता कपात करण्याची तरतूद केली आहे. मात्र येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी या नियमाचे सर्रासपणे उल्लघंन करीत आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांची कामे होत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमंडळ कृषी अधिकारी कार्यालय : वरिष्ठांचे दुुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहे. अन्यथा त्यांचा घरभाडे भत्ता कपात करण्याची तरतूद केली आहे. मात्र येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी या नियमाचे सर्रासपणे उल्लघंन करीत आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांची कामे होत नसल्याचे चित्र आहे.येथील कृषी मंडळ कार्यालयात नवीन मंडळ कृषी अधिकारी रुजू झाले आहेत. दोन कृषी पर्यवेक्षक तसेच १२ कृषी सहायक आणि १ शिपाई असा एकूण १६ कर्मचाºयांचा स्टाफ आहे. या कार्यालयातील कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत. केवळ १ कृषी सहायक व १ शिपाई मुख्यालयात राहतात. बाकी कर्मचारी दूरवरुन अपडाऊन करतात.कर्मचारी शासकीय वेळेत कार्यालयात राहत नसल्याने कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना आल्या पावलीच परत जावे लागते. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा दुर्लक्ष झाले आहे. एखाद्या शेतकऱ्यानी मोबाईलवरुन विचारपूस केल्यास मी दौऱ्यावर आहे असे उत्तरे कर्मचारी देतात.शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांच्या अपडाऊन संस्कृतीमुळे त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपूर्वी घोगरा गावासाठी २५ बॅग हरभरा शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आला होता. पण येथील कृषी सहायकांनी आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना त्याचे वाटप केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.