शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या पुढाकारने चिमुकल्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:08 IST

लातूर झालेल्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवातून परतणाऱ्या ईशान्य भारतातील मणिपूर येथील चिमुकल्यांना लोकमतच्या पुढाकाराने नागरिकांच्या सहकार्याने मदत करण्यात आली.

ठळक मुद्देअभय सावंत सरसावले : यशोदा व उडान संस्थेकडून मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लातूर झालेल्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवातून परतणाऱ्या ईशान्य भारतातील मणिपूर येथील चिमुकल्यांना लोकमतच्या पुढाकाराने नागरिकांच्या सहकार्याने मदत करण्यात आली. पुणे ते कलकत्ता मार्गे मणिपूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर आलेल्या आर्थिक संकटाला टाळण्यासाठी लोकमतने पुढाकार घेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने २१ विद्यार्थी व दोन शिक्षीकांना मदत केली आहे.लातूर येथे १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजित राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवात देशातील अठरा राज्यातील मुले सहभामी झाले होते. मनिपूर येथील २१ विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. परंतु त्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलेल्या तीन शिक्षक-शिक्षीकापैकी एका शिक्षकाला हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.औषधासाठी आलेल्या खर्चात त्यांच्या जवळील सर्व पैसे लागले. ते शिक्षक उपचार घेत असताना या विद्यार्थ्यांना दोन शिक्षीका आजाद हिंद एक्सप्रेसने शनिवारी (दि.२४) रोजी गोंदिया मार्गे कलकत्ता येथे जात होत्या. त्यांच्याजवळ पैसे नव्हते व खाण्यापिण्याचे साहित्य नसल्याची माहिती मिळताच गोंदिया लोकमतला कार्यालयातील कर्मचाºयांनी सामाजिक कार्यकर्ते अभय (सोनू) सावंत यांच्या मदतीने त्या विद्यार्थ्यांसाठी दोन वेळचे जेवण, फळे, नास्ता, पाण्याच्या बॉटलच्या दोन पेटी असे साहित्य गोंदिया स्थानकावर नेऊन त्या संकटात सापडलेल्या रेल्वे प्रवाश्यांना मदत केली. या वेळी सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, गोरेगावच्या माजी पं.स. सभापती आरती चवारे, अरविंद साव, लोकमतचे अंकुश गुंडावार, नरेश रहिले, मुकेशकुमार शर्मा, अतुल कडू, सचिन कावळे, विमुक्ता शर्मा, नरेश बोहरे उपस्थित होते. अविनाश ठाकूर यांनीही खाद्यपदार्थासाठी मदत केली. यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था तथा उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूर ता. आमगावनेही सहकार्य केले.