शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

लोकमत टॅलेन्ट सर्च परीक्षा ६ डिसेंबरला

By admin | Updated: November 29, 2015 02:42 IST

पेस आयआयटी अ‍ॅन्ड मेडिकल नागपूर व लोकमत बाल विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने वर्ग ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्याकरिता ...

नि:शुल्क प्रवेश : बक्षिसांची लयलूटगोंदिया : पेस आयआयटी अ‍ॅन्ड मेडिकल नागपूर व लोकमत बाल विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने वर्ग ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्याकरिता लोकमत टॅलेन्ट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी ही परीक्षा गोंदिया शहरात घेतली जाणार आहे. यासाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नसले तरी विजेत्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर बक्षीसांची लयलूट केली जाणार आहे.ही परीक्षा वर्गनिहाय घेतली जाणार आहे. स्टेट बोर्ड, सीबीएसई व आयसीएसई मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता बोर्डानिहाय परीक्षा घेतली जाईल. सदर परीक्षेत मागील वर्षी शिकलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. उदाहरणार्थ १० वीच्या विद्यार्थ्यांला ९ वीच्या अभ्यासक्रमातील प्रश्न विचारण्यात येतील.या परीक्षेत गणितावर-२० प्रश्न, भौतिकशास्त्रावर-१० प्रश्न, रसायनशास्त्रावर-१० प्रश्न, जीवशास्त्रावर-१० तर बौध्दीक चाचणीवर-१० असे प्रश्न विचारण्यात येतील. सर्व प्रश्न बहुपर्यायी (आॅप्शनल) स्वरूपाचे राहणार असून निगेटीव्ह मार्र्किंग पध्दत राहील. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला काळ्या रंगाच्या बॉल पेनने नोंदवायचे आहे. एकूण ६० प्रश्नांकरिता १ तास ३० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. सदर परीक्षेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी आपल्या नावाची नोंदणी लोकमत जिल्हा कार्यालय गोंदिया येथे सकाळी ११ ते १ वाजेच्या दरम्यान फोन क्रमांक २३०५०७ यावर करता येईल. तसेच श्रीकांत पिल्लेवार, जिल्हा संयोजक यांच्याकडे मोबाईल क्रमांक ९८२३१८२३६७ वर व्हाट्सअ‍ॅप किंवा मॅसेज पाठवून करता येईल. नाव नोंदणी करताना विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, वर्ग, बोर्ड ही माहिती देणे आवश्यक आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मागील वर्षाच्या अभ्यासाची व ज्ञानाची उजळणी होणार आहे.