शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 20:12 IST

जुमलेबाजीे करणाऱ्या मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कधी करणार ते सांगा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

ठळक मुद्देगोरेगाव तालुक्यात ठिकठिकाणी प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी देशातून भ्रष्टाचार दूर करु, विदेशातील काळा पैसा परत आणू, डिजीटल इंडियाचे स्वप्न साकारु आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच वर्षांचा कालावधी लोटूनही मोदी सरकारने एकाही आश्वासनाची पुर्तता केली. जुमलेबाजीे करणाऱ्या मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कधी करणार ते सांगा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोरेगाव येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत भाजप सरकारने विविध आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच सरकारला या सर्व आश्वासनांचा विसर पडला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारला आता अच्छे दिनचे काय झाले याचे असा सवाल जनतेनी करावा. केवळ निवडणुका आल्या की राम मंदिराचा मुद्दा पुढे करायचा आणि मतांचे राजकारण करायचे हेच काम मोदी सरकार करीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे दूरच राहिले उलट जाहीर केलेल्या कर्जमाफीचा सुध्दा अद्यापही पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. स्वत:ला देशाचा चौकीदार म्हणविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर संविधानाच्या प्रतिकात्मक प्रती जाळण्यात आल्या तेव्हा देशाचा चौकीदार कुठे होता असा सवाल ही जयंत पाटील यांनी केला. त्यामुळे अशा विश्वासघाती आणि जुमलेबाज सरकारला धडा शिकविण्यासाठी नाना पंचबुध्दे यांचे हात बळकट करण्यास सांगितले. येत्या ११ एप्रिलला सजगपणे मतदान करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019