शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; महारांगोळीतून मतदार जनजागृतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:38 IST

येत्या ११ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात मतदान घेण्यात येणार आहे. यात शंभर टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत सोमवारी सकाळी ९ वाजता स्थानिक इंदिरा गांधी क्रीडा संकुलच्या मैदानावर भव्य १६ हजार ९०० चौरस फुटाची महारांगोळी साकरण्यात आली.या रांगोळीत मतदार जनजागृती व ईव्हीएम, व्हीव्हीटी पॅटची माहिती देण्यात आली.

ठळक मुद्दे१६ हजार ९०० चौरस फुटाची साकारली रांगोळी : अडीच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती,मतदानासाठी स्वाक्षरी अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या ११ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात मतदान घेण्यात येणार आहे. यात शंभर टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत सोमवारी सकाळी ९ वाजता स्थानिक इंदिरा गांधी क्रीडा संकुलच्या मैदानावर भव्य १६ हजार ९०० चौरस फुटाची महारांगोळी साकरण्यात आली.या रांगोळीत मतदार जनजागृती व ईव्हीएम, व्हीव्हीटी पॅटची माहिती देण्यात आली.जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. ही रांगोळी साकारण्यासाठी विविध रंगांच्या रांगोळीचा कलावंतांनी वापर केला. महारांगोळीमध्ये गोंदिया जिल्ह्याचा नकाशा तयार करुन त्यामध्ये भारतीय संसद, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन, दिव्यांग मतदार,महिला आणि शेतकरी मतदार साकारण्यात आले. जास्तीत जास्त दिव्यांग मतदाराला प्रोत्साहित करण्यावर रांगोळीत भर देण्यात आला.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व स्वीपचे नोडल अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी देखील रांगोळी साकारण्यास आपला हातभार लावला. शिक्षणाधिकारी उल्हास नरड, गटशिक्षणाधिकारी एल.एम.मोहबंशी, गट समन्वयक विनोद पलोके, केंद्र प्रमुख बी.डी.डोंगरे, डी.बी.खोब्रागडे, कृष्णाओम फुन्ने, विजय ढोकणे, बाळकृष्ण बिसेन यांनी सहकार्य केले. सत्य साई संघटनेने कार्यक्रम स्थळी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करुन दिली होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मानले.कला पथकाने वेधले लक्षसुभाष बहुउद्देशीय संस्थेचे सुभाष मेश्राम व त्यांच्या सहकलावंतांनी कला पथकाच्या माध्यमातून मतदानाबाबत मतदान जागृतीचा संदेश दिला. महारांगोळी साकारण्यात कुलदीपीका बोरकर, प्रकाश भैरम, अरुण रामटेके, नागसेन भालेराव, शिवलाल टांक, रिसकलाल वेगड, रश्मी बिसेन, अविनाश गोंदोळे, अरुण नशिने, इरफान कुरेशी, विकास कोहाड, बालचंद राऊत, आदित्य अग्रवाल, यशोधरा सोनवाने, स्नेहलक्ष्मी साठवणे, आरती सतदेवे, जयश्री तरोणे, निर्मला नेवारे, स्नेहल ब्राम्हणकर, शशिकला डोंगरवार, उषा नरुळे, मयूर गोहळ, योगिता येळणे, आकांक्षा मेनन, कविता मेश्राम, किंजल परमार, तसेच माविमच्या सहयोगिनी यांनी सहकार्य केले.विद्यार्थ्यांनी तयार केली मानवी श्रृखंलामतदान जागृतीचा संदेश देणाऱ्या महारांगोळीच्या कार्यक्र माला विवेक मंदिर, गुरुनानक शाळा, महावीर मारवाडी शाळा, एस.एस.गर्ल्स कॉलेज, एस.एस.गर्ल्स स्कूल, मुन्सीपल कॉन्व्हेट, मनोहर मुन्सीपल हायस्कूल, मनोहर मुन्सीपल हायर सेकंडरी स्कूल, राजस्थान कन्या विद्यालय,गुजराती नॅशनल स्कूल, रविंद्रनाथ टागोर हायस्कूल, सरस्वती महिला विद्यालय आणि जिल्हा परिषद कटंगी येथील २३३८ विद्यार्थी आपल्या शाळेतून रॅलीद्वारे मतदार जागृतीचा संदेश देत स्टेडियममध्ये पोहचले. महारांगोळीच्या सभोवताल उपस्थित विद्यार्थ्यांनी मानवी श्रृंखला तयार केली होती.प्रलोभनाला बळी पडणार नाहीरांगोळी काढण्यात आलेल्या परिसरात स्वाक्षरी अभियानाच्या फलकावर मी योग्य उमेदवाराची निवड करणार, मी मतदानासाठी प्रलोभनाला बळी पडणार नाही, या वेळी शंभर टक्के मतदान करणार अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी मतदानाचा संदेश देवून त्यावर स्वाक्षरी केली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील घोषवाक्य देखील या फलकावर लिहिली.या वेळी विविध रंगांचे फुगे आकाशात सोडण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया