शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; खासदारांच्या निवडणुकीवर आमदारांचे रिपोर्ट कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:36 IST

लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्याने विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचे प्रगतीपत्रक आणि विजयावरुन विधानसभेचे तिकीट निश्चित होणार आहे. त्यामुळे जेवढी चिंता या निवडणुकीची उमेदवाराला नसेल त्यापेक्षा अधिक काळजी विद्यमान आमदारांना असल्याने ते प्रचारासाठी रात्रंदिवस एक करीत आहे.

ठळक मुद्देचांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न : गावात वाढला मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्याने विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचे प्रगतीपत्रक आणि विजयावरुन विधानसभेचे तिकीट निश्चित होणार आहे. त्यामुळे जेवढी चिंता या निवडणुकीची उमेदवाराला नसेल त्यापेक्षा अधिक काळजी विद्यमान आमदारांना असल्याने ते प्रचारासाठी रात्रंदिवस एक करीत आहे. एकंदरीत निवडणूक खासदाराची असली तरी बिपी मात्र आमदारांचा वाढला आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात गोंदिया,अर्जुनी मोरगाव, तिरोडा, भंडारा, साकोली आणि तुमसर या सहा मतदार संघाचा समावेश आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सहा पैकी पाच आमदार भाजपाचे निवडून आले तर गोंदिया विधानसभेत एकमेव काँग्रेसचा आमदार निवडून आला. मागील दोन दशकांपासून गोंदिया विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सुध्दा आपली जागा कायम ठेवण्यासाठी सर्वाधिक टेशंन भाजपा आमदारांना आहे. अर्जुनी मोरगाव, तुमसर आणि साकोली मतदार संघात भाजपाचे दमदार आमदार असतांना सुध्दा भाजपाचा उमेदवार पराभूत झाल्याने या आमदारांना आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडले.पोटनिवडणूक असल्याने पक्षांने सुध्दा ही बाब गांर्भियाने घेतली नाही. मात्र नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकल्यानंतर हा लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यातून हिरावला गेला. त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी अधिक प्रतिष्ठेची आहे. तर राष्टÑवादी काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवण्याचे खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर सुध्दा आवाहन आहे. त्यासाठीच प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल मागील काही दिवसांपासून हा मतदारसंघ पूर्णपणे पिंजून काढत आहे. सहा महिन्याने विधानसभेची निवडणूक होणार असल्याने गोंदियाचे आ. गोपालदास अग्रवाल यांनी सुध्दा प्रचार दौरा सुरू केला असून आघाडीच्या उमेदवारासाठी मतांचा जोगावा मागत आहे. मात्र भाजपाच्या पाच आमदारांसाठी लोकसभेची ही निवडणूृक अतिशय महत्त्वपूर्ण असून या निवडणुकीतूनच विधानसभेची इंनिग खेळली जाणार आहे. त्यामुळे ते सुध्दा दिवसरात्र एक करुन मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहे.उमेदवार किंवा पक्षाकडून काही मदत मिळो अथवा न मिळो स्वत:ची पुंजी लावून पक्षाचा उमेदवाराचा प्रचार करताना सुध्दा काही आमदार दिसत आहे. त्यामुळे आमदारांनी ही निवडणूक चांगलीच मनावर घेतल्याचे चित्र आहे. या मागील कारण देखील तसेच लोकसभेच्या निवडणुकीवरच विधानसभेसाठी प्रगतीपत्रक ठरणार आहे. त्यामुळे गुणवत्ता यादीत उर्तीण होण्यासाठी आमदार जीवाचा आटापिटा करीत आहे. याच प्रगतीपत्रकावरुन त्यांचा मुंबईत पुन्हा जाण्याचा रस्ता मोकळा होणार आहे.पालकमंत्र्याच्या मतदारसंघातूनच राष्ट्रवादीला आघाडीसहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे ४२ हजार मतांनी निवडून आले. विशेष म्हणजे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व असताना सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. तर पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या मतदार संघातून कुकडे यांना आघाडी मिळाली होती. गोंदिया,तुमसर आणि साकोली मतदार संघातून सुध्दा कुकडे यांना आठ ते दहा हजार मतांची आघाडी मिळाली होती हे विशेष.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक