शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; सोशल मीडियावर प्रचारयुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:16 IST

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे कोणत्याही उमदेवाराला शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक उमेदवार सोशल मीडियाचा आधार घेत आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट टाकून आपल्या ‘कार्यकर्तृत्वा’ची महती मतदारापर्यंत पोहोचविण्याची धडपड सुरू आहे. सध्या व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक उघडले की निवडणुकांच्याच पोस्टचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देभंडारा-गोंदिया लोकसभा : फेसबुक आणि टिष्ट्वटरवरही पोस्टचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे कोणत्याही उमदेवाराला शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक उमेदवार सोशल मीडियाचा आधार घेत आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट टाकून आपल्या ‘कार्यकर्तृत्वा’ची महती मतदारापर्यंत पोहोचविण्याची धडपड सुरू आहे. सध्या व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक उघडले की निवडणुकांच्याच पोस्टचा सामना करावा लागत आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुक अवघ्या आठवडाभरावर आली आहे. दोन जिल्ह्याचे क्षेत्र विस्ताराने मोठे आहे. सहा विधानसभा क्षेत्रात तब्बल १६०० गावे आहेत. रात्रंदिवस एक केला तरी उमेदवाराला प्रत्येक गावात जाणे शक्य नाही. मात्र निवडणूक तर जिंकायची आहे. मतदारांपर्यंत पोहचायचे असल्याने वेगवेगळ्या प्रचार माध्यमांचा वापर केला जात आहे. अलीकडे प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आला आहे. या स्मार्ट फोनचा उपयोग प्रचारात मोठ्या खुबीने केला जात आहे.व्हॉटस्अ‍ॅप वरील ग्रुपच्या माध्यमातून उमेदवार आपले म्हणने जनतेपर्यंत पोहचवत आहे. प्रचारसभा, नेत्यांची भाषणे आणि विविध आश्वासनाचा पाऊस सध्या व्हॉटस्अ‍ॅपवर पडत आहेत. व्हॉटस्अ‍ॅप उघडले की धडाधड शेकडो मॅसेज येवून पडत आहेत. पक्षीय उमेदवारासोबतच अपक्ष उमेदवारही यात आघाडीवर आहेत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात सध्या सोशल मीडियावरुन प्रचाराचा धुमाकूळ सुरु आहे. गावागावांत प्रचाराची रणधुमाळी अद्याप शिगेला पोहचली नाही. मात्र सोशल मीडियावर खडाजंगी सुरु आहे. निवडणूक आयोगाची सोशल मीडियावर करडी नजर आहे. सायबर सेलही त्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जपुन करणे गरजेचे आहे.राष्ट्रीय विषयांवर शेरेबाजीराष्ट्रीय स्तरावर गाजणाऱ्या मुद्यांवर जोरदार शेरेबाजी सध्या सुरु आहे. टिकाटिपणीतून पक्षाची, उमेदवाराची इमेज तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेक ग्रुपवर आता कार्यकर्त्यांत जुंपल्याचे दिसून येत आहे.नो पॉलिटिक्स प्लीज, पण लक्ष देतो कोण?स्मार्टफोनधारक व्हॉटस्अ‍ॅपच्या अनेक ग्रुपचे सदस्य आहेत. काही ग्रुप अ‍ॅडमिन आपला ग्रुप राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. सामाजिक विषयांवरुन तयार झालेल्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनची सध्या चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. नो पॉलिटिक्स प्लीज, असे वारंवार संदेश टाकूनही याकडे कुणी लक्ष देत नाही. कारण सर्वत्र ज्वर चढला आहे तो राजकारणाचा. वारंवार सुचना देवूनही दररोज पोस्ट टाकणारे कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत सध्यातरी दिसत नाही. राजकीय वातावरण तापत असतांना सोशल मीडियावर हा प्रकार वाढतच जाणार.कार्यकर्त्यांत जुंपलीनिवडणुकीची खरी रंगत सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. पक्ष आणि उमेदवारांवर सडकून टिका सुरु आहे. परस्पर विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांत सोशल मीडियावर चांगलीच जुंपल्याची दिसून येत आहे. आपलाच पक्ष कसा चांगला, आपला नेता कसा श्रेष्ठ हे सिध्द करण्याचा आटापिटा सुरु आहे.