शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

Lok Sabha Election 2019; जाहीर प्रचार बंद आता गृहभेटीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 10:21 PM

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजता ...

ठळक मुद्देआज प्रचारतोफा थंडावणार, प्रशासन सज्ज : १३ हजार २९२ अधिकारी, कर्मचारी तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहे. त्यामुळेच सोमवारी (दि.८) सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी रॅली काढून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. तर निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून दोन हजार १८४ मतदान केंद्रांवर १३ हजार २९२ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे, भाजपाचे सुनील मेंढे, बसपाच्या डॉ. विजया नंदुरकर यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत. २९ मार्चपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात झाली होती. निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या ४८ तास आधी म्हणजेच मंगळवारी सायंकाळी ६ वाजतापासून प्रत्यक्ष प्रचार थांबणार आहे.भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात १८ लाख आठ हजार ९४८ मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार आहेत. मतदानासाठी दोन १८४ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे.१३ हजार २९२ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण पूर्ण झाले असून १० एप्रिल ला सकाळी पोलिंग पार्टी मतदान केंद्रासाठी साहित्य घेवून रवाना होणार आहे. निवडणुकीसाठी २५६८ बॅलेट युनिट, २५३० कंट्रोल युनिट आणि २७०० व्हीव्हीपॅट सज्ज आहेत.आचारसंहितेचे कडक अंमलबजावणीनिवडणुकीची घोषणा झाल्यापासून आचारसंहितेचे कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. या दरम्यान २९२ वाहन, ४२ रॅली, २६४ लाऊडस्पिकर,१८४ बैठका, १५ हेलीपॅडला परवानगी देण्यात आली आहे. आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात २२ एफएसटी, २४ एसएसटी, ३२ व्हीएसटी, ९ व्हीव्हीटी टीम तैनात आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून मतदारांनी मोठ्या संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.८१ लाखाची रोकड जप्तनिवडणूक आचारसंहिता घोषीत झाली तेव्हापासून पोलीस विभागाच्यावतीने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान वाहन तपासणीतून ८१ लाख ५० हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच निवडणूक काळात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत २४ हजार २६७ लीटर दारू जप्त करण्यात आली आहे.सीव्हीजीलवर २२९ तक्रारीनिवडणूक आयोगाने नागरिकांच्या सुविधेसाठी व तक्रार निवारण्यासाठी विविध फ्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहे. त्याद्वारे जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यात आला आहे. यात एनजीआरएस ११७, कॉलसेंटर २८६, सीव्हीजील ११९ असे ४२२ तक्रारींचा समावेश आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019gonda-pcगोंडा