शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

Lok Sabha Election 2019; एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 20:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येत्या ११ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक ...

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : अधिकाऱ्यांची बैठक, चुका टाळण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या ११ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानापासून दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व महिला मतदारांसह जिल्ह्यातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही. यासाठी त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात.असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आयोजित बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.२५) आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी आचारसंहिता अंमलबजावणी आणि स्वीपचे नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, मतदान केंद्रावर आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्त केलेले समन्वय अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड (तिरोडा विधानसभा क्षेत्र), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी (आमगाव विधानसभा क्षेत्र), नगरपालिका प्रशासनचे जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव (गोंदिया विधानसभा क्षेत्र), प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एन.व्ही.नैनवाड (अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्र) उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाल्या, जिल्ह्यात येणाºया दोन लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे. मतदान केंद्रावर सर्वप्रकारच्या मतदारांना आवश्यक त्या सोयी-सुविधा व अन्य बाबीसाठी समन्वय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. समन्वय अधिकारी यांना नेमून देण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्रात आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध आहे की नाही याची प्रत्यक्ष भेट देवून खात्री करावी. काही सुविधा मतदारांना मतदानाच्या दिवशी उपलब्ध करुन दयावयाचे असल्याने त्याचे सुक्ष्म नियोजन आतापासूनच करावे. मतदान केंद्रनिहाय विवरणपत्रात अहवाल विभागीय आयुक्त नागपूर यांना सादर करावयाचा असल्याने त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.ज्या ठिकाणी दिव्यांग मतदार आहेत त्यांना व्हीलचेअरच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणेच्या सहकार्याने घरुन मतदानासाठी आणणे व त्यांना परत घरी सुखरुप पोहोचवून देण्याची जबाबदारी पार पाडावी. दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रावर रॅम्सची व्यवस्था करण्यात यावी.अंध मतदारांना देखील आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करु न दयाव्या. शौचालय व मुत्रीघराची व्यवस्था देखील मतदान केंद्रावर असली पाहिजे. औषधोपचाराची प्राथमिक सुविधा देखील प्रत्येक केंद्रावर उपलब्ध करुन दयाव्यात. पुरुष व महिला मतदारांसाठी मतदान केंद्रावर प्रतिक्षा कक्ष उपलब्ध करण्यात यावा. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात किमान एका मतदान केंद्रात संपूर्ण निवडणूक प्रक्रि या ही महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत कार्यान्वीत करावी, त्यामुळे महिला मतदार मतदानासाठी प्रोत्साहित होतील असे सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी