शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मिश्रा यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 21:57 IST

येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थसारथी मिश्रा यांनी शनिवारी (दि.६) अर्जुनी-मोरगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीच्या दृष्टीने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

ठळक मुद्देअर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्र : अधिकाऱ्यांना दिल्या मतदानासाठी टिप्स

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थसारथी मिश्रा यांनी शनिवारी (दि.६) अर्जुनी-मोरगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीच्या दृष्टीने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तहसीलदार विनोद मेश्राम, सडक -अर्जुनीच्या तहसीलदार उषा चौधरी, नोडल अधिकारी नाईनवाड, तालुका कृषी अधिकारी तुमडाम, नायब तहसीलदार पाटील उपस्थित होते.यावेळी डॉ.मिश्रा यांनी, मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाºया दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला व इतर मतदारांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करु न द्याव्यात. समाजमाध्यमांवर लक्ष दयावे. चुकीच्या त्यावर कुठल्याही पोस्ट येणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणी मतदानावर बहिष्कार टाकत असेल तर त्यांना भेटून बहिष्कार मागे घेण्याबाबत विनंती करावी. बहिष्कार टाकणे ही चांगली बाब नाही. पोलीस विभागाने निवडणुकीच्या दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडणार नाही यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. हा भाग नक्षलग्रस्त असला तरी शंभर टक्के मतदान कसे होईल यादृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती जास्तीतजास्त करावी. अवैध दारु चा पुरवठा व विक्र ी निवडणुकीच्या काळात होणार नाही यासाठी धाडसत्र मोहीम राबवावी असे त्यांनी सांगितले.उपविभागीय अधिकारी सोनाळे यांनी, जास्तीतजास्त मतदान व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात मतदार जागृतीचे विविध उपक्र म राबविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.या मतदारसंघात आदिवासी, अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग मतदारांचे प्रमाण मोठ्या संख्येत असल्याचे सांगितले. या विधानसभा क्षेत्रात २९५ गावे येत असल्याचे सांगत त्यांनी ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅटबाबत मतदार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक करु न दाखिवण्यात आली आहे. मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे. नविन मतदारांची नोंदणी करु न त्यांचे मतदार यादीत नाव येण्यासाठी अर्ज भरु न घेण्यात आले आहे.बीएलओचे व सखी बुथचे वेगळे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या विधानसभा क्षेत्रात काही गावे नक्षलग्रस्त असल्यामुळे या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत अशी राहणार आहे. ३१ मतदान केंद्रांवर वेबकास्टींग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी ढोले यांनी, निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था चोख राहील यादृष्टीने तयारी केली असून नक्षलग्रस्त भागात शंभर टक्के मतदान कसे होईल यासाठी जास्तीतजास्त मतदारांना प्रोत्साहित करणार असल्याचे सांगितले.स्ट्रॉँगरूमला दिली भेटकृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या स्ट्राँग रु मला डॉ.मिश्रा यांनी भेट देऊन पाहणी केली. कुठल्याही त्रुटी स्ट्राँगरु म व त्या परिसरात राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या. नवेगावबांध येथील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्र क्र मांक १९३ आणि १९३ ला भेट देऊन पाहणी केली. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रावर कोणत्याही अडचणी येणार नाही याची दक्षता घेण्याबाबतच्याही सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019